पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/134

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० वैदिक तत्त्वमीमांसा या प्रमाणे सर्व जगाचा कर्ता एकच असून तो सर्वज्ञ सर्वशक्ति असा आहे, हा सिद्धांत देखील ( शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते ) अनुमानाच्या योगाने सिद्ध करितां येत नाही. परंतु श्रुती मध्ये जगत्कय संबंधानें जो सिद्धांत आहे, तो एवढाच नव्हे की, जगकर्ता एकच असून तो सर्वज्ञ सर्वशक्ति असा आहे; तर असा की, जगत्कर्ता सर्वज्ञ सर्वशक्ति असून तो सर्व जगाचे निमित्तकारण व उपादानकारण आहे. हा सिद्धांत तर प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणे शक्यच नाहीं. कारण त्या संबंधाने अनुमानवादीच ह्मणतो कींः–अत्यन्तभिनयोः एव मृद्-द्रव्य-कुलालयोः निमित्त-उपादानवदर्शनेन, आकाशादेः निरवयव द्रव्यस्य कार्यत्व-अनुपपत्त्या । च, न एकं एवं ब्रह्म कृत्स्नस्य जगतः निमित्तं उपादानं च । प्रतिपादयतुं शक्नोति ॥ ( श्रीभाष्य, १।१।३) झणजे, * घटाचे मृत्तिकारूप उपादानकारण, आणि कुंभकाररूप निमित्तकारण ही परस्परांहून अत्यंत भिन्न असतात असा अनुभव असल्या मुळे, व आकाशादि जी मूळ द्रव्ये ती अवयवरहित आणि ह्मणून कार्यत्वरहित असल्या मुळे, एक ब्रह्म सर्व जगाचे निमित्तकारण व उपादान कारण आहे, असे सिद्ध करता येणे शक्य नाही.' | वरील सर्व विवेचनाचा तात्पर्यार्थ असा की, चित्स्वरूप जें ब्रह्म तेच एक सर्व जगाचे निमित्तकारण व उपादानकारण, हा सिद्धांत श्रुतीच्याच योगानें ज्ञेय आहे, केवळ प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या योगानें तो ज्ञेय नाहींअसे जरी शंकराचार्य व रामानुजाचार्य स्पष्टपणे प्रतिपादन