पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/137

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १३३ | ( ११) पूर्वी अनेक वेळा असे सांगितले आहे की, सर्वज्ञ सर्वशक्ति चित्स्वरूप असे जे ब्रह्म ते एकच सर्व जगाचे उपादानकारण आणि निमित्तकारण असा, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते, वेदांताचा मुख्य सिद्धांत होय, या सिद्धांता संबंधाने पुढील तीन प्रश्न उत्पन्न होतात:- ( १ ) जग विद्यमान आहे किंवा नाही ? (२) जग विद्यमान आहे तर त्याचे कारण चित्स्वरूप आहे किंवा अचित्स्वरूप आहे ? (३) जगाचे कारण चित्स्वरूप आहे, तर हे जे जगाचे चित्स्वरूप कारण ते त्याचे निमित्तकारणच आहे किंवा उपादानकारण देखील आहे ? हे। तीन प्रश्न याच अनुक्रमाने घेऊन, त्यां पैकी प्रत्येको सबधानें वैदिक वाङ्मया मध्ये कोणती मते प्रतिपादिलेली आहेत, व त्या मतां संबंधाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांचे काय झणणे आहे, या विषयीं आतां विचार करूं. (१) वरील तीन प्रश्नां पैकी पहिला प्रश्न असा की, जग विद्यमान आहे किंवा नाहीं ? कारण जर जगच विद्यमान नसेल तर, जगाचे कारण काय ? या प्रश्ना विषयी विचार करणे निरर्थक होय. आतां, स्थूल भाषेनें किंवा लौकिक दृष्टीने, जगाचीं तीन अंगे आहेतः–जडपदार्थरूप बाह्य जग, मनोवृत्तिरूप किंव: विज्ञानरूप अंतस्थ जग, आणि चित्स्वरूप जीवात्मे. ह्मणून, जग विद्यमान आहे किंवा नाहीं ? या प्रश्नांत अनेक प्रश्न समाविष्ट होतात, त्या प्रश्नां पैकी पहिला प्रश्न असा की, जगाचीं हीं तीन्ही