पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/164

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० वैदिक तत्त्वमीमांसा जाणिते हैं ह्मणणे अग्नि स्वतःला जाळितो असे ह्मणण्या प्रमाणे आत्मविरुद्ध आहे. आणि अशा प्रकारची आत्मविरुद्ध गोष्ट कबूल करून, बाह्य पदार्थांहून भिन्न जें विज्ञान त्याच्या योगानें तो पदार्थ जाणिला जातो, ही आत्मविरुद्ध नव्हे अशी सर्वांना माहीत असलेली गोष्ट कबूल न करणारा विज्ञानवादी मोठा पंडितच समजला पाहिजे. दुसरे असे की, विज्ञान देखील स्वतंत्रपणे, ह्मणजे विज्ञात्याच्या अभावीं, जाणिले जाणे शक्य नाही. कारण कोणत्याही वस्तूचा स्वतःवर व्यापार घडणे सर्वथैव अशक्य होय. या संबंधानें विज्ञानवादी कदाचित् असे ह्मणेल की, जर एका विज्ञानाहून भिन्न अशा दुस-या विज्ञानाने ते विज्ञान जाणिलें पाहिजे, तर त्या दुस-या विज्ञानाला त्याच्याहून भिन्न अशा तिस-या विज्ञानाने जाणिले पाहिजे, त्या तिसन्या विज्ञानाला त्याच्याहून भिन्न अशा चवथ्या विज्ञानाने जाणिले पाहिजे; अशा रीतीने अनवस्था प्राप्त होईल. आणि तो असेही ह्मणेल कीं, दीपका प्रमाणे ज्ञान स्वभावतःच प्रकाशमान असल्या मुळे, एक ज्ञान जाणिले जाण्याला दुसन्या ज्ञानाची कल्पना करणे निरर्थक आहे. कारण ज्ञान या दृष्टीने दोन्ही एकरूपच असल्या मुळे, त्यांच्या मध्ये ज्ञेय व ज्ञाता असा संबंध असणे शक्य नाही. परंतु ( शंकराचार्यांच्या मते ) हे दोन्ही आक्षेप निराधार आहेत. कारण, एकतर, ज्या अर्थी विज्ञान मात्र जाणिले जाते, व विज्ञान जाणणारा जो आत्मा तो जाणिला जाण्याचा प्रसंगच उद्भवत नाहीं, त्या अथ विज्ञानवादीने प्रतिपादिलेली अनवस्था उत्पन्न होत नाही, आणि दुसरे असे की, सर्व विज्ञाने एकजातीय अ