पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/166

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३ वैदिक तत्त्वमीमांसा वादी कदाचित् असें ह्मणेल की, विज्ञान जाणणारा विज्ञात स्वयंसिद्ध आहे असे प्रतिपादन करून, विज्ञान स्वतःलाच जाणिते हें विज्ञानवादीचे मतच तुह्मी भिन्न शब्दांनीं व भिन्न रीतीने प्रतिपादन करीत आहां. तर त्याला उत्तर असे कीं, हे ह्मणणे चुकीचे आहे. कारण विज्ञानाच्या ठिकाणी उत्पत्ति, नाश, अनेकत्व, इत्यादि जे धर्म विद्यमान असतात ते जीवात्मारूप जो विज्ञाता त्याच्या ठिकाणी नसतात, या वरून असे सिद्ध झालें कीं, दीपका प्रमाणे विज्ञान जरी प्रकाशमान ह्मणजे अवभास्यमान किंवा ज्ञेय असले, तरी ते जाणिले जाण्याला त्याच्याहून भिन्न असा विज्ञाता विद्यमान असलाच पाहिजे. - विज्ञानवादीनें जें असें ह्मटले आहे की, जाग्रत्-अवस्थे मध्ये जें वाह्य पदार्थांचे ह्मणून ज्ञान प्राप्त होते, ते स्वप्न–अवस्थे मध्ये प्राप्त होणा-या बाह्य पदार्थांच्या ज्ञाना प्रमाणेच समजले पाहिजे; त्या संबंधाने शंकराचार्यांचे मत असे:-यत् उक्तं बाह्य-अर्थ-अपलापिना स्वप्नादि-प्रत्ययक्त् जागरित-गो- चराः अपि स्तंभादि-प्रत्ययाः विना एवं बाह्येन अर्थेन भवेयुः प्रत्ययत्व-अविशेषात् इति । तत् प्रतिवक्तव्यम् । ( १ ) त्वया विज्ञानं जन्म-विनाश-युक्तं उच्यते । अतः कार्यस्य जडत्व नियमात् स्व-अतिरिक्त-वैद्यत्वे अस्माभिः साधितम् । कूटस्थ-चिदात्मनः ग्राहक–अनपेक्षुत्वात् न अनवस्था इति । उक्तम् । अतः महत्-वैलक्षण्यं आवयोः ॥ ( गोविंदानंद ) ( २ ) एवं वेद्य-विज्ञानवत् अर्थस्य अपि उपलव्धेः । न बाह्यअर्थ-अभावः इति उक्तम् । संप्रति जाग्रत-विज्ञानं, स्वप्नादिविज्ञानवत् , न बाह्य-आलंबनं, इति अनुमानं दूषयति- वैधस्यात् छ' इति ॥ ( गोविंदानंद )