पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/175

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १७१ चच्या प्रत्यक्षपणे अनुभवाला येते, असे जें ज्ञान त्या ज्ञानाच्याच आधाराने जे असे प्रतिपादन करितात की, केवळ ज्ञान हीच एक सत्य वस्तु, ते सर्व लोकांच्या उपहासाला पात्र होतात. विज्ञानवादीने जे असे झटले आहे की, ज्या अर्थी नीळ हा बाह्य पदार्थ व त्याचे ज्ञान, यांचा आपणांला एकाच काळीं अनुभव येतो, त्या अर्थी ते एकरूपच असले पाहिजेत; तें त्याच्याच मता विरुद्ध आहे. कारण ज्या पदार्थी विषयीं एकाच काळीं ज्ञान उत्पन्न होते, ते पदार्थ परस्पर भिन्नच असले पाहिजेत. ज्याचे एवढेच स्वरूप आहे की, स्वतःचा विषय जो बाह्य पदार्थ त्याच्या संबंधाने व्यवहार शक्य करणे, असे जे ज्ञान ते व त्याचा विषय यांचा अनुभव एकाच काळीं येतो; असें कबूल करून नंतर, त्यांचा अनुभव एकाच काळीं येतो ह्मणून ते अभिन्न ह्मणजे एकच, असे प्रतिपादन करणे हे हास्यास्पद होय. या करितां असें कबूल केले पाहिजे कीं, निरनिराळ्या प्रकारची ज्ञाने निरनिराळ्या प्रकारच्या बाह्य पदार्थी मुळेच उत्पन्न होतात. आणि प्रत्यक्ष अनुभवाला येणारे जें जें ज्ञान ज्या ज्या पदार्था विषयीं व्यवहार शक्य करिते; त्या त्या ज्ञानाचे जे विशिष्टत्व ते, त्या त्या पदार्थाशीं जो त्या ज्ञानाचा संबंध, त्या संबंधा वर अवलंबून असते. या करितां बाह्य पदार्थांचा अभाव प्रतिपादन करणे ठीक नव्हे. विज्ञानवादीचे जें असें ह्मणणे आहे की, स्वप्न-अवस्थेमधील ज्ञाना प्रमाणेच. जाग्रत् अवस्थे मध्ये प्राप्त होणारे जे ज्ञान तें आधारा शिवाय (ह्मणजे बाह्य पदार्थांच्या अभावीं) उत्पन्न होते; ते बरोबर नाहीं. कारण स्वप्न–अवस्थे सध्ये प्राप्त होणारें