पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/181

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १७७ - रामानुजाचार्यांच्या भाषेने सर्वास्तित्वादी पक्षाचे मत असेंः–केचित् पार्थिव-आप्य-तैजस-वायवीय-परमाणु-संघात-रूपान् भूत-भौतिकान् बाह्यान् , चित्त-चैत्तरूपान् च अभ्यन्तर-अर्थान् प्रत्यक्ष-अनुमान-सिद्धान् अभ्युपयन्ति ।.... ते च एवं मन्यन्ते । रूप-रस-स्पर्श-गन्ध-स्वभावाः पार्थिवाः ‘परमाणवः, रूप-रस-स्पर्श-स्वभावाः च आप्याः, रूप-रसस्पर्श-स्वभावाः तैजसाः, स्पर्श-स्वभावाः च वायवीयाः, पृथिवी-अप्-तेजः–वायु-रूपेण संहन्यन्ते । तेभ्यः च पृथिव्यादिभ्यः शरीर-इन्द्रिय-विषय-रूप-संघाताः भवन्ति । तत्र च शरीर-अन्तर्वार्त-ग्राहक-अभिमान-रूढः विज्ञान-सन्तानः एव आत्मत्वेन अवतिष्ठते । ततः एव सर्वः लौकिकव्यवहारः प्रवर्तते इति ॥ ( श्रीभाष्य, २।२।१७ ) झणजे, ' कांहीं असे प्रतिपादन करितात की, प्रत्यक्ष प्रमाण व अनुमान यांच्या योगाने सिद्ध होणान्या आणि पृथ्वी उदक तेज व वायु यांच्या परमाणूंनी बनलेल्या, अशा भूतरूप व भौतिकरूप बाह्य वस्तु; आणि चित्तरूप व चैत्तरूप अशा अंतस्थ वस्तु; या सर्व सत्य आहेत. त्यांचे हे मत असें कीं, रूप रस स्पर्श गंध हे ज्यांचे स्वाभाविक धर्म आहेत असे पृथ्वीचे परमाणु; रूप रस स्पर्श हे ज्यांचे स्वाभाविक धर्म आहेत असे उदकाचे परमाणु; रूप रस स्पर्श हे ज्यांचे स्वाभाविक धर्म आहेत असे तेजाचे परमाणु; व स्पर्श हा ज्यांचा द्वेष, मोह, धर्म, अधर्म, एतद्रूप ज्या मनोवृत्ति, त्या मनोवृत्ति ह्मणजे संस्कारस्कंध. या पांच स्कंधां पैक विज्ञानस्कंध ह्मणजे चित्त किंवा जीवात्मा. बाकी राहलेले चार स्कंध ह्मणजे चैत्त. व सर्व व्यवहाराला आवश्यक असे जे आध्यात्मिक जग ते त्यांच्या समुदा याने बनलेले असते. '