पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/217

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १११ ज्याच्या अविद्यमानतेच्या वैळीं अविद्यमान होते, तें. त्याच धर्म होय असा निश्चित सिद्धांत आहे. उष्णता व प्रकाश है। अग्नीचे धर्म आहेत असे याच सिद्धांताने सिद्ध होते. आणि या सिद्धांताच्या योगानेच असे सिद्ध होतें कीं, प्राण, मानसिक व्यापार, चैतन्य, स्मृति, इत्यादि ( आत्मवादींच्या मतें ) जे जीवात्म्याचे धर्म, ते वस्तुतः देहाचेच धर्म. कारण ते देहा मध्ये मात्र,-ह्मणजे देहाच्या विद्यमानते मुळे,-विद्यमान असतात; देहाच्या बाहेर,-ह्मणजे देहाच्या अभावीं, विद्यमान असत नाहींत; आणि देहाहून भिन्न वे स्वतंत्र असा जीवात्मा विद्यमान आहे असे सिद्ध झालेले नाहीं. या वरून असे सिद्ध होतें कीं, देहाहून भिन्न किंवा स्वतंत्र असा जीवात्मा विद्यमान नाहीं.' | शंकराचार्यांनी लोकायतिकांच्या या मताचे निराकरण केले आहे. ते असेः-एवं प्राप्ते ब्रूमः । न तु एतत् अस्ति यत् उक्तं अव्यतिरेकः देहात् आत्मनः इति । व्यतिरेकः एव अस्य देहात् भवितुं अर्हति । तत्-भाव-अभावित्वात् । यदि देह-भावे भावात् देह-धर्मत्वं आत्म-धर्माणां मन्येत, ततः देह भावे आप अभावात् अतत्-धर्मत्वं एव एषां किं न मन्येत, देह-धर्म-वैलक्षण्यात् । ये हि देह-धर्माः रूपादयः ते यावत्-देहं भवन्ति । प्राण-चेष्टादयः तु सति अपि देहे मृत अवस्थायां न भवन्ति । देह-धर्माः च रूपादयः परैः अपि उपलभ्यन्ते । न तु आत्म-धर्माः (१) तेषां विशेष-गुणत्व-अभावे अपि न दहेमात्र-प्रभवत्वं, मृत-अवस्थायां अर्शनात् । अतः देह-अतिरिक्तः तत्-अधिष्ठाता इति भावः ॥ ( आनंदगिरि )