पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/230

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३३५ त्पन्न होतात. या प्रमाणे कोणत्याचे कार्याच्या कारणाची व्यवस्था लागणार नाहीं,ह्मणजे कोणत्याच कारणाला मूळकारण ह्मणतां येणार नाही. या करितां कारणाची व्यवस्था लागावी ह्मणून असे मानले पाहिजे की, ज्याचे स्वरूप केव्हांहीं । बदलत नाही किंवा नष्ट होत नाहीं, व स्वतः एकरूप राहून अनेक प्रकारची विचित्र कायें उत्पन्न करण्याची ज्याच्या मध्ये शक्ति आहे, आणि जें महत् वगैरे असंख्य अवस्थांचा आश्रय होण्याला योग्य आहे, असे एकच द्रव्ये सर्व जगाचे कारण. आणि हे द्रव्य ह्मणजे सत्वगुण, रजोगुण, व तमोगुण यांची जी साम्य-अवस्था तद्रूप प्रधान, सांख्य किंवा प्रधानवादी या आपल्या उपपत्तीचे पुढील सारख्या विचारसरणीने समर्थन करतात. ज्याची रचना विचित्र आहे असे हैं प्राण्यांच्या शरीरां सहित जग आहे. आणि या जगाची रचना विचित्र असल्या मुळे ते कार्य आहे, आणि ते कार्य असल्या मुळे, ज्याचे स्वरूप जगाच्या स्वरूपाशीं एकरूप आहे, असे जें अव्यक्त किंवा प्रधान ते त्याचे कारण असले पाहिजे. कारण कोणत्याही कार्य विषयी विचार केला तरी असे दिसून येते की, त्याचा आणि त्याच्या कारणाचा स्वभाव एकरूप असून ते आपल्या कारणा पासून भिन्न असते आणि अभिन्नही असते. उदाहरणार्थ, घट मुकुट इत्यादि कार्ये, आणि मृत्तिका सुवर्ण इत्यादि त्या कार्याची कारणे, यांचा स्वभाव एकरूपच असून ती कार्ये त्या कारणांहून भिन्न असतात आणि अभिन्नही असतात. या करितां ज्याची रचना विचित्र आहे असे जे हे जग ते । ज्याच्याशी त्याचा स्वभाव एकरूप आहे अशा प्रधाना पासून