पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/255

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५० वैदिक तत्त्वमीमांसा स्वरूपाणां स्वरूप-प्रणाश-भयात् परस्परं प्रति अंगअंग-भाव-अनुपपत्तेः । बाह्यस्य च कस्यचित् क्षोभयितुः । अभावात् गुण-वैषम्य-निमित्तः महत्-आदि-उत्पादः न स्यात् ॥ ( शारीरकभाष्य, २।२।८ ) ह्मणजे, “ प्रधाना मध्ये प्रवृत्ति उत्पन्न होणे कां शक्य नाही, या विषयी आणखी एक कारण असे. सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण या सर्वांचे परस्परां संबंधाने गौणत्व किंवा प्राधान्य नष्ट होऊन यांचे जे समतारूप मूळ स्वरूप ते त्यांना प्राप्त झाले, ह्मणजे त्यांच्या त्या अवस्थेला सांख्य प्रधान ह्मणतात. परंतु सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांना ही अवस्था प्राप्त झालेली असली, ह्मणजे मग समतारूप (किंवा स्वतंत्रतारूप) जे त्यांचे स्वरूप, ते आपणच होऊन नष्ट होणे शक्य नसल्या मुळे, त्यां पैकी कोणीही इतरां संबंधाने गौण किंवा मुख्य होऊ शकणार नाहीं. आणि त्यांच्या मध्ये असा भेद उत्पन्न करण्याला ( सांख्यांच्या मते ) कोणतीही बाह्य शक्ति विद्यमान नसल्या मुळे, महत् वगैरे कायें उत्पन्न होणे शक्य होण्याला आवश्यक अशी जी सत्त्व वगैरे गुणांची परस्पर विषमता ती उत्पन्न होणे शक्य नाहीं,-अर्थात्, ती कार्ये उत्पन्न होणे शक्य नाहीं.' आणि * जर प्रधानवादी असे ह्मणतील कीं, सत्त्व वगैरे गुण साम्य-अवस्थे मध्ये असतात त्या वेळीं देखील विष| मता प्राप्त होण्याची त्यांच्या मध्ये पात्रता असते; तर त्या

  • (१) अनपेक्ष-स्वरूपाणां परस्पर-अनपेक्षाणां गुण - प्रधानत्वहीनानां अंग-अंगित्व-अयोगात कार्य-अनुपपत्तिः इत्यर्थः ॥ ( आनंदगिरि )