पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० वैदिक तत्त्वमीमांसा एवढाच प्रश्न राहला कीं, जर प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें प्राप्त होणारे जें,-अग्नि प्रकाशमान व उष्ण आहे इत्यादि,-जगविषयक ज्ञान त्या ज्ञानाच्या विरुद्ध, अग्नि अप्रकाशमान किंवा, थंड आहे इत्यादि वचने श्रुतीमध्ये असली, तर त्या वचनांच्या योगाने श्रुतिग्रंथांच्या ईश्वरप्रणीतत्वाला आणि ह्मणून त्या ग्रंथांच्या अदृष्ट विषयांसंबंधीच्या प्रामा प्याला बाध येत नाहीं काय ? या प्रश्नाला शंकराचार्यांनी असे उत्तर दिले आहे की, जर प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने प्राप्त होणा-या ज्ञानाच्या विरुद्ध दिसणारी अशी वचने श्रुतिग्रंथांमध्ये असून ती केवळ उदाहरणांदाखल नसली तर त्या वचनांचा उद्दिष्ट अर्थ असाच आहे असे समजले पाहिजे की, या अर्थाच्या योगाने हा विरोध नष्ट होईलः–यदि ब्रूयात् शीतः अग्निः अप्रकाशः वा इति, तथापि .अर्थान्तरं श्रुतेः विवक्षितं कल्प्यं, प्रामाण्य-अन्यथा-अनुपपत्तेः, न तु प्रमाण-अन्तर-विरुद्धं स्ववचन-विरुद्धं वा ॥ ( गीताभाष्य, १८॥१६.) (१) अपौरुषेयायाः श्रुतेः असंभावित-दोषायाः मानान्तरविरोधे अषि प्रामाण्यं अप्रत्याख्येयं इति अभिप्रेत्य आह,-* यदि इति । ( आनंदगिरि ) (२) स्वाथै बोधयन्त्याः श्रुतेः अविरोध-अपक्षत्वात् , विरुद्धअर्थ-वादित्वे तत्परिहाराय विवक्षितं अर्थान्तरं अविरुद्धं तस्याः स्वीकर्तव्यं, विरोधे तत्-प्रामाण्य–अनुपपत्तेः इति आह ‘ तथापि इति ॥ ९ आनंदगिरि)।