पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/265

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६० वैदिक तत्त्वमीमांसा 'पक्षीं, जर जीवात्मा नेहमी मुक्त असतो असे मानले तर मग त्याला बंधनही नाही आणि मुक्तिही नाही, असे ह्मणावे लागेल.' सारांश, शंकराचार्या प्रमाणेच रामानुजाचार्यांनी प्रधानवादा विरुद्ध असे प्रतिपादन केले आहे कीं, ( १ ) उत्पत्तिकाळाच्या पूर्वी सत्त्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांची साम्य अवस्था विद्यमान असते असे (प्रधानवादाला अनुसरून) गृहीत धरिलें; तर जग निर्माण करण्याची योग्यता प्रधानामध्ये उत्पन्न होण्याला आवश्यक लागणारे जे त्या गुणांमधील परस्पर वैषम्य, ते उत्पन्न होणे शक्य नाहीं; (२) ते वैषम्य कसे तरी उत्पन्न झाले असे जरी क्षणभर गृहीत धरिलें, तरी प्रधान चैतन्यरहित असल्या मुळे जगाच्या उत्पत्ती संबंधाने त्याच्या मध्ये स्वतंत्रपणे प्रवृत्ति उत्पन्न होणे शक्य नाहीं; आणि ( ३ ) जरी लोकायनिकां विरुद्ध प्रधानवादी चैतन्यरूप जीवात्म्याचे अस्तित्व मान्य करितात; तरी त्या जीवात्म्या कडून जगाच्या उत्पत्ती संबंधाने प्रधानाचे नियमन केले जाणे शक्य नाही. अर्थातच, जगाच्या उत्पात स्थितीची व प्रळयस्थितीची उपपत्ति ठरविण्या करितां, प्रधान व जीवात्मा यांच्याहून भिन्न अशा सर्वज्ञ सर्वशक्ति ईश्वराची विद्यमानता कबूल केली पाहिजे. आणि त्यांनी ती कबूल केली ह्मणजे मग जगाच्या उत्पत्तीची व लयाची योग्य व्यवस्था लागतेः-इतः च सत्य-संकल्प-ईश्वर- अधिष्ठान - अनपेक्षपरिणामत्वे सर्ग--व्यतिरेकेण प्रतिसर्ग- अवस्थायाः अनवस्थिति--प्रसंगातु च, न प्राज्ञ-अनधिष्ठितं प्रधानं कारणम् । आज्ञ-अधिष्ठितत्वे तस्यु सत्य- संकल्पत्वेन सर्ग-प्रतिसगे