पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/280

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ वैदिक तत्त्वमीमांसा ते परमी मधील मूळ गतीचे कारण असणे शक्य नाहीं.. आणि जर असे मानलें कीं,, अदृष्टयुक्त जे जीवात्मे ते परमाणूंशीं संबद्ध असल्या मुळे, जीवात्म्याशी संबद्ध जें। अदृष्ट त्याच्या योगाने परमाणू मध्ये मूळ गति उत्पन्न होते; तर असे देखील मानावे लागेल की, जीवात्म्या मधील अदृष्ठाचा प्रवाह. निरंतर वाहत. असल्या मुळे, एकसारखी उत्पत्तिच होत असते.. (: परंतु, वस्तुस्थिति तशी नाहीं. ) या संबंधानें परमाणुवादी कदाचित्. असें ह्मणेल कीं, अदृष्ट केवळ विद्यमान असले झणजे तेवढ्यानेच त्याच्या पासून कोणताहीं कार्योत्पत्ति होत नाहीं. अदृष्ठा पासून कार्योत्पत्ति होण्याला त्याला पूर्ण अवस्था प्राप्त झाली पाहिजे. कांहीं। अदृष्ठे अशी असतात की, ती लागलींच ( ह्मणजे या जन्मच ) पूर्ण दशेला येऊन कार्योत्पत्तिः करितात; कांहीं अन्य जन्मी पूर्ण, दशेला येऊनः कार्योत्पाते। करितात; व कांहीं अन्य उत्पत्तिकाळीं ( झणजे प्रस्तुत उत्पत्तिकाळ संपून त्याच्या पुढील प्रळयकाळ पुरा झाल्या नंतर जो पुनः उत्पत्तिकाळ येतो त्या उत्पत्तिकाळीं ) कार्योत्पत्ति करितात. आणि या प्रमाणे अदृष्टां पासून कार्योत्पत्ति होण्या करितां त्यांना पूर्ण दशा प्राप्त होण्याची आवश्यकता असल्या मुळे, एकसारखी उत्पात्तः, होत न राहतां प्रळयः काळाची देखील विद्यमानता शक्य झेते. परंतु ( रामानु जाचार्यांच्या मते ) परमाणुवादीच्या या ह्मणण्याने देखील साचे मत सिद्ध होत नाहीं.. कारण एकमेकांच्या संमती शिवाय. असंख्य जीवात्मे, निरनिराळ्या वेळीं जीं निरिनसळीं.अनेक कमें करितात, त्या कम पासून उत्पन्न होणार