पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/282

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ वैदिक तत्त्वमीमांसा ( १८) वरील विवेचना वरून असे सिद्ध होते की, शंकराचार्य आणि रामानुजाचार्य या दोघांच्याही मते ( १ ) प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें दृश्यमान असे जे अंतर्बाह्य जग ते सर्व विद्यमान असून ( २ ) चैतन्यस्वरूप ब्रह्म किंवा परमेश्वर हा त्या सर्व जगाचे कारण होय; आणि (३) त्या अंतर्बाह्य जगाहून भिन्नस्वरूप असा जीवात्मा विद्यमान आहे. आता या ठिकाणीं वर ( पृष्ठ १३३ ) निर्दिष्ट केलेल्या तीन प्रश्नां पैकीं तिसरा प्रश्न उत्पन्न होतो. तो प्रश्न असा की, जर जगाचे कारण चित्स्वरूप आहे तर हे जें जगाचे चित्स्वरूप कारण ते त्याचे निमित्तकारणच आहे किंवा उपदानकारण देखील आहे ? वैदिक वाङ्मया मध्ये असे एक मत उपलब्ध आहे कीं, अंतर्बाह्य जग विद्यमान आहे, त्या जगाहून भिन्नस्वरूप असा जीवात्मा विद्यमान आहे, आणि ब्रह्म किंवा परमेश्वर हा त्या सर्व जगाचे कारण. परंतु जे तत्त्वमीमांसक हे मत प्रतिपादन करीत ते असे मानीत क़ीं, ब्रह्म हे जगाचे केवळ निमित्तकारण, (१) ज्या द्रव्याच्या योगानें कोणतीही वस्तु बनविली जात स्या द्रव्याला त्या वस्तूचे उपादानकारण किंवा तिची प्रकृति ह्मणतात; आणि ज्या शक्ती कडून ती वस्तु बनविली जाते त्या शक्तीला त्या वस्तूचे निमित्तकारण ह्मणतात. उदाहरणार्थ, मृत्तिका हे घटाच उपादानकारण असून कुंभार हे त्याचे निमित्तकारण, अर्थातच, घटा प्रमाणे ज्या वस्तूचे उपादानकारण आणि निमित्तकारण हीं परस्पर भिन्न असतात, त्या वस्तूच्या निमित्तकारणा कडून तिच्या उपादा झारणाचे नियमन केले गेल्या मुळे ती उत्पन्न होते.