पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य २३ सत्यग्रहण यांपासून पराङ्मुख केलें असे होईल. सारांश, शंकराचार्य, रामानुजाचार्य, इत्यादि भाष्यकारांवर भाषाशा स्वमीमांसकांनी आणलेला आरोप जरी खरा असला, आणि ह्मणून या भाष्यकारांनी मूळ ग्रंथांतील भाषेची वाटेल तितकी * ओढाताण' करण्याला उत्तेजन दिले हे जरी, पूर्वी सांगितल्याप्रमाणे, भाषाशास्त्राच्या व इतिहासशास्त्राच्या दृष्टीनें अनिष्टकारक होय, असे कबूल करावे लागले, तरी सत्यान्वेषणाच्या व सत्यग्रहणाच्या दृष्टीने हे त्यांचे करणे प्रशस्यच मानिले पाहिजे. आतां, शंकराचार्य किंवा रामानुजाचार्य यांच्या अनुयायांपैकी जे उपनिषदें वगैरे ग्रंथ ईश्वरप्रणीत असे मानीत असतील, ते त्यांच्या भाष्यरूप ग्रंथांतील विचार झणजे उपनिषदें वगैरे मूळ ग्रंथांतीलच विचार असें समजतील, इतर सर्व, मग ते त्यांचे अनुयायी असोत किंवा नसोत, त्यांच्या भाष्यरूप ग्रंथांतील विचार ह्मणजे त्यांचे ( भाष्यकारांचे ) स्वतःचे विचार असे समजतील. परंतु या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कीं, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांत कोणत्या मतांचे प्रतिपादन केलेले आहे व कोणत्या मतांचे खंडन केलेले आहे ? - याप्रमाणे, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांकडे पाहण्याच्या ज्या दोन, दृष्टि आहेत असे वर सांगितलें। त्यपक एकीचे विवेचन करितां करितां आपण दुसन्या