पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ वैदिक तत्त्वमीमासा होतात, ती काव्ये शब्दशः पूर्वी विद्यमान असत नाहीत. आणि या करितां ऋषींना वेदद्रष्टे किंवा मंत्रद्रष्टे असेही ह्मणतात. | या संबंधानें कदाचित् अशी शंका उत्पन्न होईल कीं, जर वेद नित्य आहेत,-ऋषींना उपलब्ध होण्या पूर्वी पूवर्षीच्या युगां मध्ये देखील जर ते तसेच विद्यमान होते, तर ज्यांना ते या युगाच्या आरंभीं उपलब्ध झाले, त्या ऋषींना वेदकर्ते किंवा मत्रकर्ते असे कसें ह्मणतां येईल ? किंवा जर ऋषि वेदकर्ते तर वेद नित्य कसे ? रामानुजाचार्यांनी या शंकेचे असे निराकरण केलें आहेः-- मंत्रकृतः वणीते, नमः ऋषिभ्यः मंत्रकृद्भवः, अयं असौ अग्निः इति विश्वामित्रस्य सूक्तं भवति', इत्यादि वसिष्ठादीनां मंत्रकृत्व-कांडकृत्वऋषित्वादौ प्रतीयमाने अपि वेदस्य नित्यत्वं उपपद्यते । एभिः एव मंत्रकृतः वृणीते इत्यादिभिः वेदशब्दैः तत्तत्-काण्ड-सूक्त-मंत्र-कृतां ऋषीणां आकृति-शक्त्यादिकं परामृश्य, तत्-तत्-आकारान् तत् तत् शक्तियुतान्ः च सृष्ट्वा, प्रजापतिः तान् एव तत्-तत्-मंत्रादि-स्मरणे नि युक्ते । ते च प्रजापतिना आहित-शक्तयः तत्-तत्-अनुगुणं तपः तप्त्वा, वीर्यसिद्धान् पूर्व–पूर्व-वसिष्ठादि-सृष्टान् मंत्रादीन् अनधीत्य एव स्वतः वर्णतः च अस्खलितान् पश्यन्ति । अतः च वेदानां नित्यत्वं एषां च मंत्रकृत्त्वं उपपद्यते ॥ ( श्रीभाष्य, १।३।२८ ) ह्मणजे, ६ मंत्रकर्ते जे ऋषि त्यांची निवड करितो, मंत्रकर्ते जे ऋषि त्यांना नमस्कार असो, ' हा तो अग्नि' हें विश्वामित्राने केलेलें सूक्त आहे, ५ इत्यादि बचनां मध्ये जरी वसिष्ठादींना मंत्रकर्ते, कांडकर्ते, ऋषि, हटले आहे; तरी त्या मुळे वेदांच्या 'नित्यत्वाला बाध येत्