पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/81

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ कराचार्य आणि रामानुजाचार्य ब्रह्म इत्तर प्रमाणांच्या योगानें ज्ञेय असल्या मुळे, तद्विषयक ज्ञान। संबंधाने श्रुति प्रमाण मानली पाहिजे असे ह्मणणे ठीक नव्हे. कारण जी गोष्ट इतर साधनांनी गम्य नाहीं, अशा गोष्टी संबंधानेच श्रुतीची गरज लागते. परंतु जो कोणी असा आक्षेप घेईल त्याला असे विचारावें कीं, ज्या इतर प्रमाणाच्या योगाने ब्रह्म गम्य आहे असे प्रमाण कोणते ? प्रत्यक्ष प्रमाणाच्या योगाने तर ब्रह्म गम्य नाही. तसेच, अनुमानाच्या योगानेही ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य नाहीं. ह्मणून ब्रह्माचे अस्तित्व ज्ञेय होण्याला श्रुती शिवाय दुसरें कांहीं साधन नाहीं. अर्थातच, जर ब्रह्म इतर कोणत्याही प्रमाणाने ज्ञेय असते, तर त्या विषयीं निरूपण करण्याला श्रुति प्रवृत्त झाली नसती. ) वरील विवेचना वरून असे सिद्ध होते की, ज्या अर्थी प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने ज्या गोष्टी ज्ञेय नाहींत । त्यांच्या संबंधाने ज्ञान करून देणे हा श्रुतीचा हेतु होय, व त्यांच्या संबंधानें श्रुति प्रमाणभूत मानिली पाहिजे; त्या अर्थी ज्या गोष्टी इतर प्रमाणांनीं ज्ञेय आहेत, त्यांच्या संबंधार्ने ज्ञान करून देणे हा श्रुतीचा हेतु नव्हे. वे ह्मणून अशा गोष्टी संबंधानें श्रति प्रमाणभूत नव्हे. आणि ही गोष्ट शं. कराचार्यांनी शद्वशः प्रतिपादन केली आहेः-प्रत्यक्षांदिप्रमाण–अनुपलब्धे हि विषये....श्रुतेः प्रामाण्यं, न प्रत्यक्षादि-- विषये। अदृष्ट दर्शन-अर्थत्वात् प्रामाण्यस्य । (गीताभाष्य, १८।६६) ह्मणजे, ' प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें जो विषय गम्य नव्हे अशा विषया संबंधाने श्रुति प्रमाणभूत मानली पाहिजे,-जो विषय प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने गम्य आहे