पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ वैदिक तत्त्वमीमांसा कारणात् भवति, तत् ब्रह्म । ( शारीरक भाष्य, १।१।२ ) झणजे, ‘सर्वज्ञ व सर्वशक्ति असे जें या जगाच्या उत्पत्तीचे, स्थितीचे वलयाचे कारण ते ब्रह्म होय. प्रथमे पादे....समस्तस्य जगतः जन्मादि-कारणं ब्रह्म इति उक्तम् । तस्य समस्तजगत्कारणस्य ब्रह्मणः व्यापित्वं, नित्यत्व, सर्वज्ञत्वं, सर्वशक्तित्वं सर्व-आत्मत्वं इति एवंजातीयकाः धर्माः उक्ताः एव भवन्ति ।। ( शारीरक भाष्य, १।२।१ ) ह्मणजे, * सर्व जगाच्या उत्पत्तीचे, स्थितीचे, व लयाचे कारण ब्रह्म, असे पहिल्या पादा मध्ये प्रतिपादन केले आहे. व त्या प्रतिपादनानेच असे निर्दिष्ट केले आहे की, सर्व जगाचे कारण जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी सर्वव्यापित्व, सर्वज्ञत्व, सर्वशक्तित्व, सर्वात्मत्व हे व अशा प्रकारचे धर्म आहेत,' प्रथमें अध्याये सर्वज्ञः सर्वेश्वरः जगतः उत्पत्ति-कारणं... स्थिति–कारणं.... उपसंहार-कारणम्...., सः एव च सर्वेषां नः आत्मा इति ....प्रतिपादितम् ।। ( शारीरक भाष्य, २।१।१ ) ह्मणजे, * सर्वज्ञ असा जो परमेश्वर तो जगाच्या उत्पत्तीचे, स्थितीचे वे लयाचे कारण असून, तोच आपला सर्वांचा आत्मा होय, असे पहिल्या अध्याया मध्ये प्रतिपादन केले आहे.' - हीच गोष्ट रामानुजाचार्यांच्या पुढील सारख्या वाक्यांनी सिद्ध होतेः- ब्रह्म-शब्देन चे स्वभावतः निरस्त-निखिलेदोषः, अनवधिक-अतिशय-असंख्येय-कल्याण-गुणगणः पुरुषोत्तमः अभिधीयते ॥ ( श्रीभाष्य, १।१।४ ) झणजे, * स्वभावतःच ज्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसून कल्याणकारक असे अनंत गुण आहेत, असा जो पुरुषोत्तम, तो ब्रह्म या शब्दाने निर्दिष्ट होतो. '