पान:व्यवहारपद्धति.pdf/100

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७ ३ . ] बलाबल विचार. हिश्शांत, व दुर्भिक्ष असेल तेव्हां आद्याच्या पाउण हिश्शांत, खर्च आटपेल अशा धोरणाने खर्चाचा बेत राखावा. व्यवहारी लोकांचे द्रव्य बहुधा व्यापारांत गुंतलेले असते, ते बहुतकरून जरूरीच्या वेळेस खुले होऊन उपयोगी पडत नाहीं, यामुळे अशा प्रसंगी दुस-या कडून ऐवज आणण्याची पाळी येते, व तसे झाले झणजे माणसाची इभ्रत जाते. इभ्रतीवर मोठमोठी कामे पार पडत असतात, यासाठी ती कमी होऊ नये ऋणून, जो गृहस्थ आपल्या व्यवहाराच्या मानाप्रमाणे कांहीं नियमित रोकड सदोदित जवळ बाळगतो, त्याचा भ्रम खुला न होतां, लोकांत त्याची इभ्रत रहाते. मनुष्याच्या ऐपतीचा भ्रम व साख, या दोन गोष्टी मिळून पत होते. ऐपत आहे पण साखसचाटी नाही, तर पत रहात नाहीं. बरें साखसचोटी आहे पण ऐपत नाही, तर सावकारास आपली रक्कम परत येण्याचा भरंवसा पटत नाही, यामुळे पत रहात नाहीं. घरांत तहादर रोकड व बाहेर पत असली झणजे, प्रसंगवशात् कांहीं किफायतवार सवदा जुळून आल्यास, तो पदरीं पाडितां येतो. व संकटकाली अडचणींत पडून दुस-याचें घर पहावे लागत नाहीं. द्रव्य होता होईल तोपर्यंत आपले हातांत राखावें, ते दुस-याच्या हातांत जाऊ देऊ नये, पण कारणपरत्वें