पान:व्यवहारपद्धति.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ ३ . ]. बलाबल विचार. र्शीपणाचे लक्षण नव्हे. तसेच राजा, राजसेवक, वेश्या, चंधु, विधवा, कामावरून दूर केलेले नोकर, व दुर्वर्तनी पुरुष यांशीं देवघेवीचा व्यवहार सर्वथैव वर्ज करावा. आतां मंत्रबलाविषयी विचार करू. मंत्र या शब्दाचा अर्थ येथे गुप्त मसलत असा आहे. योग्य व गुप्त मसलतीने जयप्राप्ति होते. बुद्धिचातुर्याने ठरविलेल्या मसलतीने जसा कार्यभाग पार पडतो, तसा पराक्रमानेही पार पडत नाहीं, झणूनच ज्ञात्यांनी झटले आहे, “ उपायेन हि यच्छक्यं न तच्छक्यं पराक्रमैः” शिवाजी महाराज, बरोबर दहावीस सेवक घेऊन दिल्लीस अवरंगजेबाचे भेटीस गेले असतां, ते ज्या वाड्यांत रहात होते, त्या वाड्यासभंवतीं अवरंगजेबाने पोलादखान कोतवालाच्या पांच हजार लोकांचा पहारा ठेवून महाराजांस प्रतिबंधांत ठेविलें. दहावीस लोकांसहवर्तमान परक्या ठिकाणी पांच हजार लोकांच्या वेढ्यांत सांपडल्यावर महाराज जरी पराक्रमी होते, तरी केवळ पराकमाच्या जोरावर त्यांस शिर सलामत राखून वेढ्याची | १ घृणी, राजा, पुंअली, राजभृत्यः, पुत्रो, भ्राता, विधवा बालपुत्रा, । सेनानीवी, चोद्भुतभूतिरेव व्यवहारेषु वर्जनीयाः स्युरेते ।। ३० ।। उद्योगपर्व, अ० ३७. २ मंत्रमूलं च विजयं प्रवदन्ति मनस्विनः ।। ६ वा. रामायण, युद्धकाण्ड, सर्ग ६.