पान:व्यवहारपद्धति.pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ ३ . ] बलाबल विचार. असो, येथवर मंत्रबलाविषयी जे चार ठळकठळक विचार सुचले ते यथामतीने निवेदन केले, आतां सरतेशेवटी एवढेच सांगणे आहे की, जयप्राप्तीस साधनीभूत जें मंत्रिमंडळ, तें संग्रहीं असल्यानेच केवळ जयप्राप्ति होते, असा अर्थ नाहीं. साधकाने त्या साधनांचा योग्य रीतीने उपयोग करून घेतला पाहिजे. दुरुपयोग केल्यास अनर्थ रोकडा ठेविलेला आहे, असे पक्के समजावे. बाळाजी विश्वनाथांच्या कारकीर्दीपासून पेशवाईची इभ्रत आपल्या तरवारीच्या जोरावर वाढविणारे, व योग्य पसंगी नेकनामी सल्ला देणारे, मल्हारराव होळकर, व त्यांच्यासारखे आणखी दुसरे तरवारबहाद्दर व मुत्सदी जवळ असतां सोनपतपानपतच्या लढाईत भाऊसाहेबांनी त्यांचा बुद्धिवाद न ऐकतां, आपलांच आग्रह चालविला, यामुळे कसा परिणाम झाला, तो सर्वीस महशूर आहेच. हितेच्छु पुरुषाने नीतीला अनुसरूनही केलेला उपदेश कालाच्या तावडीत सापडलेल्या मनुष्यास रुचते नाहीं, असें जें झटले आहे, ते अक्षरशः खरे आहे. भाऊसाहे १ काव्येतिहाससंग्रहांत छापलेली होळकरांची कैफियत, पान २४, २५, २६, पहा. | २ सुनीत हितकामेन वाक्यमुक्तं दशानन । न गृहन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः ।। २० ।। रामायण, युद्धकाण्ड. सर्ग १६.