पान:व्यवहारपद्धति.pdf/113

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० [ प्रकरणः - व्यवहारपद्धति. चंदीचंदावर प्रांत जाऊन आपली स्थिरस्थावर केली, व ते तेथे बळ धरून राहिले, आणि मुत्सद्यांच्या सल्लयापमाणे वागून अवरंगजेबाच्या घशांत गेलेलें राज्य, त्याच्या नरड्यांत हात घालून, हिसकावून घेतले. आपल्या आईस मारणा-या सापत्न भावाच्या मुलास शत्रूच्या हातून सोडविण्याकरितां एका रात्रींत मोठी दहापंधरा कोसांची दौड करून अवरंगाबादेची पेठ मारली, ते दिवशीं जर शाहूमहाराज अवरंगाबादेत असते तर, ह्या छाप्यांत त्यांची सुटका खचित झाली असती, परंतु योग आला नव्हता ह्मणून गोष्ट फसली. सावत्र भावाचें लेंकरू शत्रूच्या हाती सांपडलें असतां, व मनगटाच्या जोरावर गेलेले राज्य पुनः संपादन केले असता, त्यांस सिंहासनारूढ होण्याची इच्छा झाली नाहीं, व तशी बदसल्ला देऊन दुफळी माजविण्याची कोणी हांव धरली नाही, ही गोष्ट सामान्य नव्हे. राजारामसाहेबांनी अखेर पर्यंत मंचकावर बसून शाहूमहाराजांच्या नांवाने राज्यकारभार केला, ही गोष्ट शाहण्या पुरुषांनी आपल्या हृदयावर खोदून ठेविण्यासारखी आहे. १ मल्हाररामरावकृत थोरल्या राजाराम साहेबांचे चरित्र पान ६३ पहा. ३ मल्हाग्रामवकृत थोरल्या राजाराम साहेबांचे चरित्र पान्ह ६९ पहा. | |