पान:व्यवहारपद्धति.pdf/123

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० व्यवहारपद्धति. [ प्रकरण तोंडावाटे बढाईचा चकारशब्द काढित नाहींत, जे धन्यापुढे सत्य व मितभाषण करितात, ज्यांस धन्याचें कांहीं नुकसान होत आहे, असे दिसून आल्याबरोबर जे हुकुमाची वाट न पाहतां, त्या नुकसानीचे निवारण करण्यास झटतात, आणि स्वामिकार्याकरितां भूक, तहान, थंडी, व श्रम यांची गणना बिलकुल करीत नाहींत, तेच खरे कार्यकर्ते सेवक, बाकीचे सारे पोटभरू होत. हे जोपर्यंत श्रमसायासाची वेळ आली नाही, तोपर्यंत ढेकर येई तों खातील, आणि आणीबाणीची वेळ आली की सोडून जातील. - पिढीजादे कुलीन सेवक, स्वामीकडून अपकार झाला असतांही, खाल्लेल्या अन्नाची जाण विसरत नाहींत. अशा कुलीन सेवकांनी पूर्व अपकार न आठविता, प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून स्वामीचे रक्षण केल्याची इतिहासप्रसिद्ध अनेक उदाहरणे आहेत. | शिवाजीमहाराजांच्या परमपेतले सेवक बाळाजी आवजी चिटणीस व त्यांचे बंधु शामजी आवजी, आणि वडील चिरंजीव आवजी बल्लाळ अशा त्रिवर्गास, कलुशा नामक हलकट मनुष्याच्या चिथावणीवरून, संभाजीमहाराजांनी हत्तीच्या पायीं दिले, तरीही बाळाजी आवजींचे दुसरे चिरंजीव खंडो बल्लाळ यांनी मनांत अपकाराची आ