पान:व्यवहारपद्धति.pdf/124

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रें.] बलाबल विचार. १११ ठवण न धरितां, ते संभाजीमहाराज गोंव्यावर स्वारी करून जात असतां, त्यांच्या स्वारीमागून पायउतारा जात होते, इतक्यांत कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी मदनगडाहून कांहीं राजकारणी पत्रे आली, त्यांचा जाब लिहून देप्यास कोणी स्वारी समागमें लिहिणारा आहे काय ? झणून संभाजीमहाराजांनी जवळच्या शिपाईप्याद्यांस विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर केलें कीं, चिटणिसांचे चिरंजीव स्वारी समागमें पायउतारा धावत येत आहेत. ते समयीं संभाजीमहाराजांनी खंडो बल्लाळ यांस हाक मारवून पत्राचे जाब लिहिण्यास आज्ञा केली, त्या काळीं तत्क्षणच जमीनीवर बसून चिटणिसांनी जाब लिहिले. इतक्यांत सरकारस्वारी बरीच पुढे गेली होती, तरी त्यांनी धांवत जाऊन सरकारच्या हातची मोहरनिशाणी पत्रांवर करून ती जिकडच्या तिकडे रवाना केली. परंतु धावण्याचे श्रम जिवापरते झाल्यामुळे ते तेथेच रक्ताची गुळणी ओकून पडले. हे पाहून संभाजीमहाः राजांनी त्यांस पाणी प्यावयास देऊन स्वारीस घोडाहीं दिला. अशा रीतीने सरकारस्वारी समागमें घोड्यावर १ कुलीनाः शौर्यसंयुक्ताः शक्ता भक्ताः क्रमागताः । ते तु संमानमात्रेण प्राणैरप्युपकुर्वते ।। पंचतन्त्रम्. मल्हाररामरावकृत संभाजी. महाराजांचे चरित्र पान १३।१४ पहा.