पान:व्यवहारपद्धति.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिया. १२३ अधिकार असतो. श्रीकृष्णानी कौरवसभेत पांडवांतर्फे जें दूतत्व केले, ते अशाच प्रकारचे होते. धर्मराजाने, त्यांस बरे दिसेल ते आपण बोलावे, अशी मुकत्यारी दिली होती, ही गोष्ट सर्वांस विदितच आहे. असेच गोविंदराव काळे, हे पेशव्यांच्या तर्फे हैदराबादेस निजामअल्लीखां यांचे दरबारी वकील होते, त्यांच्या समक्ष, मोंगलाचे दिवाण मश्रुन्मुलुख यांनी तमाशा करवून भर दरबारांत सवाईमाधवराव व नानाफडणीस यांचीं सोंगे आणविली. ते समयीं काळे यांनी पेशव्यांच्या इतल्याशिवाय आपल्या मुकत्यारीने निजामअल्लीखां सारख्या राजपुरुषाशी प्रतिज्ञापूर्वक जरबीचे भाषण केलें, व पेशव्यांनीही सेवकाचा अभिमान धरून त्या भाषणाची निभावणी केली, या दोन्ही गोष्टींपासून अनेक प्रकारचे बोध घेता येण्यासारखे आहेत. हे काळे यांचे भाषण स्वामिप्रभाव दर्शित करणारे, समयोचित, निर्भय असूनही विनीत, व करारीपणाचे कसे होते, याचा मासला सर्वांस कळावा ह्मणून ते येथे उतरून घेणे, आह्मांस बरे वाटते. गोविंदराव काळे निजामअल्लीखांस ह्मणाले, “हा १ पेशव्यांची बखर, काशिनाथ नारायण साने यांनी प्रकाशित केलेली. आवृत्ति चौथी पान १३९ पहा.