पान:व्यवहारपद्धति.pdf/142

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ ४ थे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिया. केलेल्या शत्रूच्या पराभवाची साधने मिळवीत राहून अनुकूल समय आला की, त्याचा उच्छेद करावा. अवरंगजेबाचे राज्य मोठे, बल फार, व संपत्तीही अपार, यास्तव तो आपणास पीडनीय शत्रु आहे, उच्छेद्य नव्हे, असा विचार करून शिवाजीमहाराजांनी होतांहोईल तो त्याशी उघड सामना देण्याची टाळाटाळ केली, व ते त्यास गनीमी काव्याने सतत वीस वर्षे एकसारखी पीडा देत राहिले. महाराजांच्या उपद्रवामुळे त्यास कधीही सुखाची झोंप घ्यावयास सांपडली नाहीं.. आतां कर्षणीय शत्रू कोणचे ते सांगतो. आपले दोन शत्रु जर ते परस्पर शत्रुत्वाने वागत असतील तर त्यांपैकीं जो आपणास विशेष बाधक नसेल, आणि ज्याचा नाश कालावधीने झाला तरी चालण्यासारखे असेल, तो आपला कर्षणीय शत्रु समजावा. अशा शत्रूचा नाश तत्काल करितां येण्यासारखा असला तरी त्याचा नाश न करितां, फक्त त्यास तंबी देऊन व कशबल करून राखून ठेवावा. कारण तहाच्या योगाने त्यास बगलेत मारून आपणा उभयतांचा दुसरा जो बलिष्ठ शत्रु असतो, त्याचा समाचार घेण्यास त्यास तोंडाशीं देता येते. तसेच आपले बंधुवर्ग व दाईज हे मत्सराने किंवा गर्वाने आपणाशी द्वेष करू लागतील, परंतु सर्वस्वापहार,