पान:व्यवहारपद्धति.pdf/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण दक्षता न ठेविली, तर लढाईत जय होईलच ह्याचा भरंवसा नाही, अशी मनाची पक्की समजूत असू द्यावी. व वकिलांस मुद्दे नीट समजावून देण्यास आपण स्वतः वकील, किंबहुना त्यांचे गुरु बनावे लागते, तेव्हां पार लागत असतो, ही गोष्ट कोणीही विसरू नये. बहुतेक वकील केवळ नसराळ्याचे काम करीत असतात. व या नसराव्याच्या गळ्यांत बेपर्वाई, हलगर्जीपणा, व गर्व इत्यादिकांचा मळ साचलेला असतो. यामुळे आपण त्यांच्या तोंडांत जे ओतावे, तेही नीटपणे बाहेर पडत नाहीं. साक्षीदारांस न्यायासनासमोर खोटे बोलणे, हें बेअबूचे पापकर्म आहे, असे सांपत वाटत नसल्यामुळे त्यांवर लक्ष ठेवणे, फार जरूर असते. हल्ली कोर्टात शपथेवर खोटे बोलणे, हे सांप्रदायिकच झाले आहे. त्यामुळे जनांत अप्रतिष्ठितपणा किंवा कुत्सा होईल, अशी धास्ती कोणासही उरली नाही. या करितां साक्षीदारांनी सत्यच्युत होऊ नये, याबद्दल दक्षता ठेवणे प्रस्तुत आवश्यक आहे खरे, तरी त्यांस अमुक रीतीने साक्षी या, असे शिकवू नये. लाचलुचपत देऊन त्यांस खोटे बोलावयास लावणें निंद्य आहे. वादांत आपली बाजू हलकी पडली किंवा वाद सफाई बुडाला, तरी बेहेत्तर, परंतु जय होण्याकरिता