पान:व्यवहारपद्धति.pdf/162

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे. ] शत्रु व त्यांची प्रतिक्रिया. १५१ परंतु पूर्वकथित सर्व उपाय, जोपर्यंत आत्मजय झाला नाही, तोपर्यंत व्यर्थ होत. ज्यास मनोर्जय झाला नाहीं, तो शत्रुजय कसा करणार ! या करितां यत्नेकरून पहिल्याने षड्रिपूंचे दमन करावें. अमर्याद वाढलेला मत्सरभाव व स्वार्थाभिलाष ह्यांचे निग्रहाने दमन केल्याशिवाय, कोणासही स्वपरहित साधणें नाहीं. प्रत्येक इसम आपले कर्तव्य समजून निरभिलाष बुद्धीने देशहितार्थ झटेल, तर प्रत्येकाचे स्वहित साधणे दुःसाध्य नाही. हे तत्व वरील दुष्ट मनोविकारांच्या फिसादीमुळे, सांपत बहुतेकांस कळत नाहींसे झाले आहे. याकरिता मनोजयाची अत्यंत आवश्यकता दाखवून हे प्रकरण पुरे करितो. पुढील प्रकरणी देशहितांत प्रत्येकाचे स्वहित कसे गुंतलेले असते, ह्याविषयी विचार करावयाचा आहे. प्रकरण चौथे समाप्त. | २ आत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्चशत्रवः । अजितात्मानरपतिर्विजयेत कथं रिपून्. । शान्तिपर्व,