पान:व्यवहारपद्धति.pdf/203

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण विल्या शिवाय निकाल होणे शक्य नसते. याकरिता सामान्य लढ्याबद्दल दुराग्रहास पेटून विरोध वाढवीत बसू नये. | घर बहुधा एक्या कुटुंबाच्या सोयीचे बांधलेले असते, त्यांत भावाभावांच्या वाटण्या होऊन चार कुटुंबे नांदू लागली झणजे ते कोणाएकासही सोयकर होत नाही. याकरिता ते एकाने घेऊन बाकीच्यांनी आपल्या हिश्शाबद्दल रोख पैसा अगर दुसरी मालमत्ता घ्यावी, आणि निराळी घरे बांधून रहावें. एक्या घरांत कूडभिंती घालून एकमेकांची अडचण सोशीत, व एकमेकांस अडचण करीत राहू नये. असे केल्याने गैरसोय होत नाहीं, व निकट सान्निध्याने बायकापोरांवरून तंटे होण्याचा संभव रहात नाहीं. घर फुटण्यास बहुधा बायका कारण होतात. त्यांचे प्राबल्य संसाराच्या अनेक छत्यांत नानाविध प्रकारांनी हानिकारक होत असते, या करितां त्यांशी कसे वागावे, याविषयी विचार करणे इष्ट आहे. | स्त्रिया जशा अपकारक आहेत तशा त्या महान उपकारकही आहेत, यास्तव त्यांपासून बाधा न होतां सुखप्राप्तीच होईल, अशा रीतीने कधी कठोर व कधीं मृदु, अशा तारतम्यविचाराने त्यांशीं वागले पाहिजे. स्त्रिया