पान:व्यवहारपद्धति.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ प्रकरण व्यवहारपद्धति. स्कळित झालेला जनसमुदाय राष्ट्रीय विपत्तीच्या वावटळींत नाश पावतो. सूक्ष्म विचार केला तर बुभुक्षितपणामुळे जरी अनीतिमत्ता उद्भवत असली तरी तो बुभुक्षितपणाच केवळ आमच्या सांपतच्या अनीतिमत्तेस सर्वांशीं कारण आहे, असे आह्मांस वाटत नाही. कोणताही देश कितीही कंगाल झाला तरी त्यांत कांहीं लोक समृद्ध व खातेपिते असतातच. त्याप्रमाणे आमच्याही देशांत गांवोगांव असे कांहीं समृद्ध लोक आहेत, व त्यांचाच अनीतिमत्तेत पहिला नंबर आहे. अशा लोकांस अन्त तहेची पापकर्ने प्रतिष्ठितपणाचा बुरखा घेऊन जशी करितां येतात तशी, साधने नसल्यामुळे गरीब लोकांस करितां येत नाहींत. प्रसंगवशषीं कंगाल लोकांनी पोटासाठीं चोरीमारी केली, तरी ती आठचार दिवसांच्या शिधापाण्याच्या मोबदल्यांत अखेर श्रीमंत लोकांच्या पेटींतच सांठविली जाते. वरवर पाहणारास दिसणारे जें ह्या दांभिकांचे धर्माचरण ते खरोखर अधर्ममूलकच असते, व हे धनलोभी लोकच गरीबलोकांस अनीतीच्या खळग्यांत १ पापानां वियधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम ! ॥ ५८ ।। लुब्धाः पापं व्यवस्यन्ति नरा नानिव हुश्रुताः । अधर्मा धर्मरूपेण तृणः कृपा इवावृताः ।। ५९ ।। तेषां इमः पवित्राणि प्रलापा धर्मसंश्रिताः । सर्व हि विद्यते तेषु शिष्टाचारः सुदुर्लभः ।। ६० ।। वनपर्व, अ० २०७,