पान:व्यवहारपद्धति.pdf/228

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें.] कौटुंबिक विचार. २१९ संस्था निर्माण केल्या, तर त्यांत नवे काय आहे ? त्या संस्थांस ' राष्ट्रीय ' हे उपपद् जोडल्याने तर आह्मांपैकीं कांहीं लोक बुजत नसतील ना ? मला वाटते का शब्दाला भिण्या इतके आमचे लोक त्या शब्दाशीं अपरिचित नाहींत, व सरकारही नुसत्या शब्दास wिण्याइतके भेकड नाही, असे असूनही, या संस्था पुंहावे उत्पन्न करणान्या ह्मणून कांहीं लोक गर्गशा करितात, ह्यांतलें इंगित काय असावे, हे पाहूं गेलें तर, असे दिसून येतें कीं, कांहीं तरी लटके निमित्त योजून सरकारच्या मनांत नसती शंका उत्पन्न करावी, व त्यायोगें सरकारास आपण राजनिष्ठ आहों, असे भासवावें, आणि आपल्या देशबांधवांस बाहुली बनवून सरकारच्या आश्रयाने इतराहून आपण वरचढ व्हावे, असा सा लोकांचा मतलब असावा. सांगकाम्याप्रमाणे सामान्य दर्जाची राजसेवा करावी, किंवा मोलमजुरी करून पोट भरावे, याशिवाय कोणच्याही प्रकारची दगदग सरकार आह्मांस पडू देत नाहीं, यामुळे आह्मी आज तीन चार पिढ्या केवळ बाहुल बनत गेलो, त्यामुळे आज आह्मांत करामत बिलकुल उरली नाही. ती करामत अंगांत यावी, ह्मणूनच लोकशिक्षणाची दगदग आपणास शिरावर घ्यावयाची आहे.