पान:व्यवहारपद्धति.pdf/238

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें. ] कौटुंबिक विचार. २२९ जातात, ते सर्व विषय राष्ट्रीय शाळांत शिकविले जाऊन धर्मशिक्षणादि आणखी पुष्कळ गोष्टी जास्त शिकवावयाच्या आहेत. दोन्ही शाळांतील शिक्षणपद्धतींतही जमीनअस्मानचे अंतर आहे. सरकारी व राष्ट्रीय शाळांतील शिक्षणांमध्ये उद्देश, धोरण, विषय, शिक्षणपद्धति, व पुस्तकें इत्यादि सर्वच गोष्टींत फरक आहे, तो येथे सविस्तर सांगण्याइतकी जागा नाहीं. तथापि सरकारी शाळांतील शिक्षणाने होत असलेले दुष्परिणाम, व राष्ट्रीय शाळांतील शिक्षणाने पुढे घडून येणारे सुपरिणाम, यांचे येथे दिग्दर्शन केल्यास दोहोंप्रकारच्या शिक्षणांतील फरक ध्यानीं येण्यास फारशी अडचण पडणार नाहीं. सरकारी शाळांतील शिक्षणाने, असावें एक आणि भासावें एक, अशी विक्षेपबुद्धि उत्पन्न होते, आत्मविश्वास नाहीसा होऊन, आह्मी दुर्बल व नेभळे आहों, | असे वाटते, स्वदेशाच्या पूर्वेतिहासाचे खरे ज्ञान न होता, आपल्या थोरपुरुषांविषयीं व त्यांच्या पराक्रमाविषयी मनांत असद्भावना उद्भवते. पण ह्याच्याच उलट राष्ट्रीयशिक्षणाने, आत्मविश्वास, आपल्या थोर कुलपरंपरेची स्मृति, राष्ट्रपुरुषाची ओळख, स्वदेशाची पूर्वस्थिति व आजची स्थिति यांतील तफावतीचे ज्ञान, हल्लींची दुःस्थिति सुधारण्यास लागणा-या शारीरिक, मानसिक,