पान:व्यवहारपद्धति.pdf/278

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वें. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २६९ तीचे लोक चांगले धट्टेकट्टे असूनही भिक्षेचा सोपा धंदा उचलून निर्वाह करू लागले आहेत, अशा लोकांस भिक्षा घालून देशांत आळसाची वृद्धि करणे, नीट नाहीं. आंधळा, पांगळा, व सातारा ज्यास कोणी पोशिंदा नाहीं, अशास मात्र भिक्षा घालावी. उद्योगधंदा करण्यास लायक अशा मनुष्यास, मग तो कोणच्याही जातीचा असो, त्यास भिक्षा घालू नये. | गोंधळी, जोशी, कोल्हाटी, चित्रकथी, व भाट इत्यादि लोक आपणास भिक्षेकरी वाटतात, व त्यांसही आपण भिक्षेकरीच आहों असें सांप्रत वाटू लागले आहे, परंतु विचारे करून पाहतां, ते गुणी लोक असून आपला गुण लोकांस दाखवून पोट भरणारे आहेत, व ह्या लोकांस पैसा, धान्य, व उतारवस्त्र ह्या रूपाने बिदागी देण्याची पुरातन वहिवाट आहे, व त्या वहिवाटीस अनुसरून हे लोक दाराशी येतात. आपल्या देशांत न्हावी, सुतार, व लोहार इत्यादि कारागीर लोकांसही धान्याचे बलुतें देण्याची वहिवाट असे. ही वहिवाट जरी सांप्रत मोडत चालली आहे. तरी देखील ती अद्याप कोठे कोठे आढळते. हल्ली मागें सांगितलेले लोक अंगीं गुण न बाळगतां व लोकरंजन न करितां,भिकान्याप्रमाणे भीक मागतात, यातव त्यांस अंगी गुण नसेल तर कांहींएक देऊ नये.