पान:व्यवहारपद्धति.pdf/284

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वें.] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २७५ बहुधा प्राप्त होतो. परंतु, मरून तीन चिमटया राख झाल्यावर पुरुषास कीर्तीचा काय उपयोग ? मृत मनुष्य आपली कीर्ति ऐकून आनंद पावत नाहीं. मढ्यौला शृंगार जितको सुखदायक होतो, तितकाच मेल्या माणसास त्यांचा नावलौकिक सुखदायक होतो. जिवंत असतां लोकांनी केलेला धन्यवाद कानी आला तर फायदा, पण तसा योग बहुधा येतच नाहीं. या शिवाय सद्वर्तनाने वागले झणजे कीर्ति होतेच असा नेम कोठे आहे ? कारण, ती होण्यास गुणग्राहक व निर्मत्सर लोकांची अपेक्षा असते. पण सर्वच सद्वर्तनी पुरुषांस निर्मत्सरी गुणग्राहकांच्या भेटीचा अगर संगतीचा योग कोठे लाभतो ? व ती लाभला नाही तर त्यांची वाहवा व्हावी कशी, व चौहाँकडे कीर्ति पसरावी कशी ? बरें यदाकदाचित काही थोडे गुणग्राहक मिळून कीर्ति झालीच, तर ती दुस-या अनेक मत्सरी व अनभिज्ञ लोकांच्या दूषणांनी मलीन व संदिग्ध होते. नुकतेच गॅसवाशे वर्षांपूर्वी होऊन गलेल्या राजकीय पुरुषांच्या कीर्तीस देखील मत्सरी व १ मृतस्य कीय किं कार्यं भस्मीभूतस्य देहिनः । मृतः कीर्ते न जानीते जीवन्कीर्ति समभुते ।। ६ ।। मृतस्य कीर्तिर्मय॑स्य यथा माला गतायुषः । अहं तु वां ब्रवी*येतद्भक्तासीतिहितेप्सया ।। ७ ।। वनपर्व अ० ३०१ ।