पान:व्यवहारपद्धति.pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. १९ । राख फांसून भिक्षाही मागितली, पण हीं सारी जिवावरचीं, अनीतीची व हलकेपणाची कृत्ये इमामदांडग्यांपासून गरीब देशबांधवांचा बचाव करावा ह्मणून केलीं, स्वसुखाकरिता केली, असे नव्हे. यास्तव त्या कृत्यांस अनीति कसें ह्मणावें ? लोकोत्तर गुणांनी संपन्न अशा राजकीय पुरुषांचे वर्तन सामान्य जनांच्या वर्तनाहून कांहीं भिन्न असते हे तत्व सर्वमान्य आहे. सामान्यनीति विशेष नीतीने बाधित असते, यामुळे कधी कधीं नीतीला अनीतीचे स्वरूप व अनीतीला नीतीचे स्वरूप • प्राप्त होते. यास्तव दुष्टजनांच्या निष्कारण पीडेपासून अगर कौटिल्यापासून जेव्हां सरळमार्गाने बचाव होत नसेल; अथवा व्यक्तिविशेषाचे थोडे अहित करून पुष्कळ सार्वजनिक सुख साध्य होत असेल, व ते साधण्यास सरळ मार्ग नसेल, तेव्हां थोडीशी अनीति स्वीकारली असतांही ती व्यवहारांत नीतिरूपच होते. । नीतिवर्तन झणजे समयोचित सद्वर्तन में यथासांग १ लोकवृत्तादाजवृत्तमन्याह बृहस्पतिः । तस्माद्राज्ञाऽप्रमत्तेन स्वार्थश्चिन्त्यः सदैव हि ॥ ६ ॥ सभापर्व, अ० ५५. चातुर्वर्ण्यहिता हि कर्तव्यं राजनुना ।।। श्लोक १७ ते १९ नृशसमनूशंसं वा प्रजारक्षणकारणात् ।। पहा. पातकं वा सदोष वा कर्तव्यं रक्षता सदा ।) रामायण, बालराज्यभारनियुक्तानामेष धर्मः सनातनः ।।१ कांड, सर्ग २५.