पान:व्यवहारपद्धति.pdf/56

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३। २ . ] दिनचर्या. व्हता, फक्त सुभेदाराकडून जे हुजूर कागदपत्र येत, ते पाहूनच महाराजांनी चिटणिसांच्या गुणांचे अनुमान करून सुभेदारास गळ घातली, व त्यांस मागून घेतलें, आणि केवळ आपल्या जिवाचा कलिदा समजून पदरीं बाठगिलें. यावरून महाराजांस मनुष्याची पारख कशी करितां येत असे, या गोष्टीचे अनुमान सहज करितां येईल. पहिल्या बाजीराव साहेबांनीही आपल्याकडे हार घेऊन मल्हारराव होळकरासारख्या शूर पुरुषांचा संग्रह केला, यावरून मनुष्याची पारख, व योग्यप्रसंगी आवश्यक असणारी सबूरी, हे दोन्ही गुण त्यांच्या अंग चांगलेच होते, असे ऋणणे भाग पडते. बाजीरावसाहेब व मल्हारराव होळकर यांच्या पहिल्या मुलाखतीची हकीत मोठी विचारणीय आहे. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ व पहिले बाजीराव ह्यांस मोंगलाईत लुटालूट करून मोंगलांस उपद्रव देण्याचा परवाना दिला होता. राजाने प्रतिस्पर्धी राजाच्या राज्यास उपद्रव देत राहून, त्यास क्षीणबल करावे, हे राजनीतिदृष्ट्या वि १ काव्येतिहाससंग्रहांत छापलेली होळकरांची कैफीयत पान २ ते ४ पहा. - २ पातश्च महीपालः पुरोनीकस्य योजयेत् । उपरुश्वारिमासीत राष्ट्र चास्योपपीडयेत् ॥ शांतिपर्व.