पान:व्यवहारपद्धति.pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ [ प्रकरणः | व्यवहारपद्धति. मिळू दिले नाही, यामुळे खान अगदी जेर होऊन पतापरावांस शरण आला, व कुराणावर हात ठेऊन, इतःपर मी महाराजांचा आहे, त्यांच्या वचनाबाहेर वागणार नाहीं. अशी त्याने शपथ केली, यास्तव प्रतापराव यांनी त्यास माघारे जाऊ दिले. हे वर्तमान महाराजांस कळल्यावर त्यांनी “ सख्य कोणाच्या हुकुमाने केले. ) असे प्रतापराव यांस विचारून किंचित् रोष केला, तो या तेजस्वी पुरुषास सहन झाला नाहीं. तेजस्वी पुरुष हजारों विपत्ति सहन करितो, पण त्यास अपमानाचा एक शब्दही सहन होत नाहीं. ६ ॥ सहते शतशरपातानवाश्चैकांकश न वा सहते । सहते विपत्सहस्रं अवमानं न सहते मानी ॥” असे झटले आहे, ते खरे आहे. जातिवंत घोडा रणांगणांत शेंकडों तीक्ष्ण बाणांच्या जखमा सहन करितो, परंतु चाबकाच्या एका फटक्याने त्याच्या अंगाचा तिळपापड होतो. महाराजांनी दिलेला टपका प्रतापरावांच्या जिव्हारी लागला होता, यामुळे त्यांनी पुढे एके प्रसंगी बाहलोळखान यासः पन्हाळे प्रांतीं गांठून त्यावर ते एकदम तुटून पडले, व त्या लढाईत तरवारीचा वार लागून सरकारकाम आले अशा रीतीने हा थोर पुरुष धारातीर्थी प-- तन पावल्यामळे, महाराजांस आपली एक बाजू