पान:व्यवहारपद्धति.pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० व्यवहारपद्धति. । | [ प्रकरण इमानी माणसे फारशीं सांपडत नाहींत. व थोडबहुत सांपडली तरी धन्याच्या हलगरजीपणामुळे ती आळशी व लबाड होतात. निरनिराळ्या प्रकारची कामें प्रत्येक मनुष्य न गमतां करील तर, सात तासामध्ये किती काम होत असते, याची सरासरीच्या मानाने अटकळ बांधून ठेवावी, व त्या धोरणावर मजूर वगैरे लोकांकडून दिवसाचे काम झाले आहे, कीं नाहीं, ते पहावे. कामाचा अंदाज असल्याशिवाय काम कमी केले ह्मणून उगाच कोणाशीं किरकीर करू नये. काम पुरापूर झाले असून अनमानधपक्याने टपका दिल्यास नोकरलोक, मालकास कळत नाही, असे समजून जास्तीच ढिलाई करितात, व टपक्याची क्षीत बाळगीत नाहींत. याकरितां वरील तत्व नेहमी मनांत बाळगून प्रत्येक कामाची पक्की अटकळ बांधून ठेवणे, हे फार आगत्याचे आहे. कामास लागणारे हत्यारपात्यार व सामानसुमान, कामास आरंभ करण्यापूर्वीच भरपूर व चोख जमा करून ठेवावे, तसे न केले तर सबबी सांगून नोकरांस टंगळमंगळ करण्यास फावते, व आपणास त्यांच्या पदरीं हयगय घालण्यास जागा रहात नाहीं. अशा रीतीने आठपासून साडेदहा वाजेपर्यंत कामाची