पान:व्यवहारपद्धति.pdf/74

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रे . ] दिनचर्या., ६१ देखरेख झाल्यावर घरी येऊन लागलेच हातपाय धुवावे. व साडेदहापासून अकरा वाजेपर्यंत नैवेद्यवैश्वदेवादि कर्मे आटोपून किंचित् आल्यागेल्याची वाट पहावी. व कोणी पांथस्थं अगर खरा अन्नार्थी, असा अतिथिअभ्यागत आल्यास, त्यास पंक्तीस घेऊन भोजन करावे. परान्नपुष्ट भोजनभाऊ ब्राह्मणास जेवू घालू नये, व आळशी करू नये. श्वानप्रमाणे परानावर उपजीविका करण्याची जो इच्छा करतो, तो अधम ब्राह्मण समजावा. अशा पापी मनुष्याच्या पुरानभोजनाला धिःकार असो. आपल्या घरी स्वकष्टाने मिळविलेली कोंयाची भाकर व भाजीपाला खाऊन निर्वाह करणे श्रेयस्कर आहे. परंतु अपमान सोसून नेहमी दुस-याच्या घरी जेवणाराला चांगले पक्वानही श्रेयस्कर होत नाहीं, यास्तव अशा लोकांस जेवू घालण्याबद्दल सज्ज १ अध्वनि सीणगात्रश्च पथि पांसुसमन्वितः । पृच्छते ह्यन्नदातारं गृहमायाति चाशया ॥ तं पूजयाय यत्नेन सोतिथिह्मणश्च सः ।। ६२६३ वनपव, अ० २०६:। - २ श्ववत्कीलालपो यस्तु परान्नं भोक्तमिच्छति । धिगस्तु, तस्य तद्भुक्तं कृपणस्य दुरात्मनः ।। २९ आर्जित स्वैन वीर्येण नाप्यपाश्रित्य कंचन । फलशाकमपि श्रेय भोक्तुं ह्यकृपणं गहे ॥ ३० परस्यतु गृहे भौतुः परिभूतस्य नित्यशः । सुसृष्टमपि न श्रेयो विकल्पोयमतः सताम्. ।। ३१ वनपर्व, अ० १९३: ।