पान:व्यवहारपद्धति.pdf/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण फक्त शिलकसांखळी मिळविणे व तारीख बंद करणे राखून ठेवून कचेरी पांच पासून साडेपाच वाजण्याच्या आंत बंद करावी. । र येणेप्रमाणे, प्रातःकाळी सुमारे तास दोन तास घराबाहेर जाऊन नोकरचाकरांच्या कामाची चौकशी व दुपारी पहरसहाघटका दप्तरचे काम, पहात गेल्यास कितीही फैलाव्याचा व्यवहार असला तरी, त्याचा आरोप होण्यास अडचण पडत नाहीं, व काम दररोज शिस्तवार केले तर श्रम व वेळ फार न लागतां, ह्याच वेळांत कायदेकानू व हायकोर्टाचे ठराव वगैरे व्यवहारोपयोगी माहिती संपादन करण्यास विपुल वेळ सांपडतो. अशा रीतीने साडेपाच वाजेपर्यंत नेटाने काम केल्यानंतर देवदर्शन व रपेट करण्यास जावें. बाहेर फिरावयास जातांना कोणास तरी बरोवर घ्यावे, व त्याचा दर्जा असेल त्याप्रमाणे त्याशीं संभाषण करावे. हवा जिकडे स्वच्छ वहात असेल तिकडे सहल करणे चांगलें. सहल करून घरी परत आल्याबरोबर हातपाय धुवून संध्यावंदन व धूपारती करावी आणि भोजनाची सिद्धता होईपर्यंत, गुराढोरांस खाणे घातलें व दुधे कोढली किंवा नाही, याची चौकशी करून भोजन करावे.