पान:व्यवहारपद्धति.pdf/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

وای २ ३.] दिनचर्या. तद्नंतर आठ वाजेपर्यंत पानसुपारी झाल्यावर थोडा वेळ मुलेंलेंकरें व आश्रित ह्यांशी संभाषण करून कचेरीस बसावे, व रोजची शिलकसांखळी मिळवून, दूर असलेल्या समवयस्क मित्र मंडळीस सल| गीची किंवा गुप्त मजकुराची पत्रे, जी आपण स्वतःच लिहिली पाहिजेत, ती लिहावीं. आणि सूर्योदयापासून झालेल्या घडामोडींचे पर्यालोचन व दुस-या दिवशीच्या कामाची योजना करून नोकरा चाकरांस जे हुकूम सांगावयाचे असतील ते सांगावे, व दहा वाजल्याबरोबर कचेरीतून उठावे, आणि अंतर्गृहांत एकांतस्थली जावे. । तेथे गेल्यावर मित्र व विश्वासू सेवक यांच्या द्वारें गांवांतील कुटाळ मंडळीच्या उपद्वयापांची व वैन्यांच्या कारस्थानांची बातमी घ्यावी. मागे सांगितलेच आहे कीं, गांवांत अगर परगांवांत जी घराणी आपल्या आअयावर किंवा अनुषंगाने नसतात, त्यांत कोणी पतिस्पर्धी, कोणी मित्र, व कोणी उदासीन असा विविध प्रकार असतोच, त्यांत जे उदासीन असतात, त्यांजपासून आपणास कोणच्याही प्रकारचा उपसर्ग नसतो, व मित्र असतात, ते तर आपले हितचिंतकच असतात, परंतु जे प्रतिस्पर्धी असतात, ते आपल्या नाशावर असतात, ह्या करितां त्यांस आपल्या दाबांत ठेविता यावें, झणून त्यांची व्यंगे व बलाबल आपणास माहित