पान:व्यायामशास्त्र.pdf/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५९ ] | श्वासोच्छास नेहमीं नाकाने करावा. तो तोंडाने कधीही करू नये.-नाकांत श्लेष्मा व केस असतात, त्यायोगाने नाकांतून हवा जात असतां त्यांत जो केर किंवा घाण असते ती केसांस लागून किंवा श्लेष्म्यास लागून अडविली जाते व हवा जणू काय गाळली जाऊन पुढे जाते. तसेच हवा नाकाच्या लांब व बांकदार नळींतून जात असतां तिला या नळीच्या स्पर्शाने उबदारपणा येतो. अशा प्रकारे नाकाच्या योगाने हवा गाळली जाऊन उबदार होत असल्यामुळे, तिच्यांतील घाणीचा अथवा तिच्या गारव्याचा फुफ्फुसांवर परिणाम होत नाही. अशा प्रकारची व्यवस्था तोंडांत केली नसल्यामुळे तोंडाने श्वासोच्छ्वास केल्याने फुफ्फुसांस अपाय होण्याची भीति असते. कित्येक क्षय रोग्यांची तोंडे नेहमी उघडी असतात व ते तोंडाने श्वासोच्छ्वास करीत असतात. यावरून ताडाने श्वासोच्छ्वास करणे अपायकारक आहे,-निदानीं तें वाईट लक्षण आहे असे दिसून येईल. नाकाने श्वासोच्छ्वास करण्याची सवय लहानपणापासून मुलांस लावण्याची खबरदारी आईबापांनी जरूर घ्यावी. व्यायामास निषिद्ध प्रसंग.-एखादा क्षीणता आणणारा विकार झाला असतां, अथवा अतिरिक्त मानसिक श्रम केल्यानंतर लागलीच, व्यायाम करू नये. मानसिक व शारीरिक श्रम करण्यास जी शक्ति लागते, ती प्रत्येक व्यक्तीमध्ये नियमित असते. या शक्तीचा उपयोग एक प्रकारचे श्रम करण्यांत ज्या मानाने कमी अथवा अधिक होईल,त्या मानाने तिचा जास्त अथवा कमी भाग इतर प्रकारचे श्रमाचे वांट्यास