पान:व्यायामशास्त्र.pdf/123

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७० ] हाच त्यांचा मुख्य गुण आहे. स्नायु संकोच पावूनच शारिरांतील हालचालीचे व ओझे उचलण्याचे काम करतात. हा गुण स्नायूंचे अंगी राहण्यास त्यांच्यामध्ये मऊपणा ( अर्थात् बेताचा ) हा गुण आवश्यक आहे; म्हणून मऊपणा हा स्नायूंचा स्वाभाविक व आवश्यक गुण आहे असे दिसून येईल. स्नायूस अतिरिक्त श्रम दिल्याने त्यांच्यांतील संकोच्यता हा गुण कमी होऊन, त्यांचे तंतु सांधणारे जे दुसरे संयोजक तंतु असतात, त्यांची वृद्धि होते, व हे तंतु जात्या टणक असल्याने त्यांचे वृद्धीने स्नायूस टणकपणा येतो. हा टणकपणा स्नायूंचा सण नसून दोष आहे; म्हणून स्नायूस फाजील दार्श्व आणण्याचा प्रयत्न करू नये. बुक्कीने धोंडे, फोडण्याची किंवा दुसन्याने आपल्या दंडास गुद्दा मारला तर त्याचे मुठीस इजा व्हावी अशी ज्यांची महत्त्वाकांक्षा असेल, त्यांना पाहिजे तर स्नायु दगडाप्रमाणे टणक करण्याचा प्रयत्न करावा; परंतु चापल्य, आरोग्य, उत्साह........वगैरे गुण ज्यांना पाहिजे असतील, त्यांनी ही महत्त्वाकांक्षा बाळगू नये. ज्यांचे शरीर कमावलेले व निरोगी असते अशांचे स्नायु मऊ असतात. सँडो वगैरे मल्लांचे स्नायु हातास दगडाप्रमाणे टणक न लागतां मऊच लागतात ही गोष्ट ध्यानांत ठेवावी. | एकाद्या इंद्रियास वाजवीपेक्षा जास्त मेहनत झाल्याने त्याच्या स्नायूस जे दाढ्य येते त्या योगाने ते इंद्रिय कांही दिवस मजबूत झाल्यासारखे वाटते खरे; पण त्यांतील लवचिकपणा नाहीसा