पान:व्यायामशास्त्र.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* १९९९ - -- यायामशाल. ..,,,, --*: - भाग १ ला, : व्यायामशास्त्राची माहिती समजण्यास शारीरशास्त्र व इंद्रियविज्ञान शास्त्र यांचे थोडे ज्ञान असणे अवश्य आहे; न्हणून त्यांसंबंधी अत्यावश्यक माहिती पुढे दिली आहे. ... शरिराचे मुख्य घटक अवयव किंवा भाग. हाडे, मज्जा, मज्जातंतु अथवा ज्ञानतंतु, नळ्या व पिंड, स्नायु, आणि त्या सर्वांवर त्वचेचे आच्छादन ही मिळून शरीर बनले आहे. मुस्तकांतील मेंदु व त्यापासून सर्व शाररांत गेलेले तंतु हे मज्जा व मज्जातंतु या सदराखाली येतात. अन्न पचविणारी, व शरिरांतील मल वाहून नेणारों इंद्रिय व शरिरांत रक्ताचा पुरवठा करणारा रक्तवाहिन्या हीं नळीच्या आकाराची आहेत, म्हणून त्य, सर्वांचा समावेश.. नव्या या नांवांत होतो. शरिरास ला|णारे भिन्न रस तयार करणारी इंद्रियं ही पिंड होत. शरिरांतील हालचाल ज्या मांसाच्या दोन्यांचे आकुंचन होते ते स्नायु होत. ( ज्यास मांस म्हणतात ते स्नायूच होत. त्यांना कोणी मांसर , मांसाच्या दोन्या अथवा पेशीही म्हणतात.) हाडे व त्वचा ऊर्फ कातडी या संज्ञांचा अर्थ स्पष्ट आहेच.. || शरिरातलि हाडे, । सामान ठेवण्याच्या पाकिटास ज्याप्रमाणे लोखंडी सांगाडा. किंवा घरास ज्याप्रमाणे खांब व तुळया, त्याप्रमाणे शरिरास हाडे होत, हाडांच्या योगाने शाररास बळकटी आलेली आहे.