पान:व्यायामशास्त्र.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४० ] ५ चित्तवृत्ति उल्लसित राहते. ६ हस्तादि अवयवांचे कौशल्य वाढते. ७ जे खेळ दोन टोळ्या किंवा पक्ष करून खेळावयाचे असतात ते खेळल्याने सहकारित्वाची संवय लागते. जे खेळ दोन पक्षांमध्ये खेळावयाचे असतात ते खेळ खेळण्यास एकी, आज्ञाधारकत्व, आत्मविस्मृति, सहकारिशीलता वगैरे गुण लागतात; यामुळे या गुणांची वाढ होते. ज्या लोकांमध्ये हे गुण नसतात, त्यांच्या मुलांना टोळ्या करून खेळण्याचे खेळ विशेष आवडत नाहींत. युरोपियन लोकांपैकी जे लोक ( उदाहरणार्थ इंग्लिश, जर्मन इ० ) एकी, सहकारिता वगैरे गुणांविषयी प्रसिद्ध आहेत, अशा लोकांच्या मुलांना टोळ्यांनी खेळावयाच्या खेळांची जितकी आवड आहे, तितकी इतर लोकांच्या मुलांना नाही असे अनुभवास येते. बायसिकल. जाण्याच्या वेगांत मोकळ्या हवेचा भरपूर पुरवठा फुफ्फुसांस होऊन रक्तशुद्धि होते व आनंदांत पुष्कळ व्यायाम होतो. शिकार. धाडस, चापल्य, प्रसंगावधान इत्यादि गुण अंगीं येतात. मोकळी हवा व सृष्टिसौंदर्य यांची आवड उत्पन्न होते. दांडपट्टा व फरीगदगा । १ स्नायुचालनज्ञान वाढते. अर्थात् नेम मारण्याचे सामर्थ्य वाढते. २ प्रसंगावधान येते.