पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ शेस्पियरकृत - नाट्य माला. मुक्त होण्याला एक चांगला उपाय आहे, आणि त्या उपा- यानें दडपशाहीच्या तत्वाचें प्रयोजनच मुळी पडणार नाहीं. हा उपाय म्हटला म्हणजे स्वभाषेचा अभ्यास हा होय. पण सध्यां स्वभाषेचा अभ्यास होत आहे कोठें ? तो व्हावा तसा होत नाहीं व इंग्रजीसारखी परिपक्क भाषा-जिचा चांगला अभ्यास होत आहे ती जवळ उभी आहे. अशा वेळीं शब्द अडला म्हणजे इंग्रजी भाषेकडे लिहिणारांची दृष्टि वळावी हैं स्वाभाविक आहे व त्यांनी इंग्रजींतील शब्दाचें अनुकरण करावें हें योग्य आहे. परंतु तसे करतांना त्यांनीं आपली बुद्धि खर्चून तारतम्य ठेविलें पाहिजे, व शब्दांच्या योग्यायोग्यत्वाचा विचार केला पाहिजे, तसा विचार सध्यां होत नाही एवढेच आमचें म्हणणें आहे. आणि जर विचार होत नाहीं तर तो अविचारच म्हटला पाहिजे हे उघड आहे. त्याचेंच भाषादूपण हैं फळ होय. डोक्याला शीण न देतां शब्दास शब्द ठेऊन देऊन इंग्रजी शब्दाचें व वाक्याचें भाषांतर करण्याची रीत अत्यंत अप्रयोजक आहे, असें येथें शेवटी म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. आतां 'मी' आणि 'आम्ही' या शब्दांचा उपयोग मराठीत कसा होतो हे आपण पाहूं. 'मी ' हैं एक- वचन व 'आम्ही' हें त्याचें अनेकवचन होय. अर्थात स्वतः विषयी व्यक्तिविषयक कांहीं बोलणें किंवा लिहिणें झाल्यास 'मी ' असा एकेरी प्रयोग करणें प्रशस्त आहे, तसेंच पुष्कळ व्यक्तींविषयीं लिहिणें झाल्यास 'आम्ही' असा बहुवचनी प्रयोग केला पाहिजे, हेंहीसर्व संम्मत आहे. परंतु 'मी' असा एकेरी प्रयोग करणें प्रशस्त असतांही त्याच्या ठिकाणी ' आम्ही ' असा प्रयोग करण्याची मराठी भाषेची