पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ४९ धाराने रचलें असले पाहिजे असे मानावयास बळकट आधार आहे. शेस्पियरकवीनें तर आपल्या नाटकांतील बहुतेक हकीगत 'गिया नेटो' या गोष्टीतूनच घेतली आहे हें वर सांगितलेच आहे. आता दुसरें कथानक " करंडकांची निवड ' हें होय. बहुधा हैं कथानक शेकस्पियरकवीने 'गेस्टा रोमॅनोरम' (Ge- हें sta Romanoram ) या ग्रंथांतून घेतलें आहे. हा ग्रंथ मूळ इटाली भाषेत असून त्यांत अनेक चमत्कारिक गोष्टीचा संग्रह आहे. त्याचें भाषांतर शेकस्पियरकवीच्या पूर्वी इंग्लडांत झाले होतें. अर्थात तें त्याच्या पहाण्यांत आलें यांत शंका नाहीं. यांत ' गियानेटो' या गोष्टीचाच बहुतेक अनुवाद केला असून, करंडकाच्या निवडीचें प्रकरण मात्र कांहीं पालटून घातलेलें आहे. व आपल्या कवीनेंहि याचेंच अनुसरण आपल्या नाटकांत केलेले आहे असें तुलनेंवरून दिसून येते. करंडकाच्या निवड- णूकीत ग्रथित केलें आहे तें हें कीं, जगांत गाजरपारखी लोक फार, ते वस्तूंच्या वाहेरच्या आविर्भावाला मात्र भूलतात. हे चांगलें नाहीं. अनेक वेळां बाहेरून ओंगळ दिसणा-या वस्तूं- तहीं स्पृहणीय असा गूढ अर्थ साठविलेला असतो. यास्तव जे सुज्ञ आहेत ते वास्तविक गोष्टीचीच निवड करितात, हें तत्व सामान्यें करून अनेक पुरातन काळच्या दंतकथांतहि प्रदर्शीत केलेल दिसून येतें. कोणा राजानें फाटकी वस्त्रे अंगावर अस- लेल्या व ओंगळ दिसणाऱ्या भिका-यास जवळ वोलावून त्याचा आदरसत्कार केला; आणि हे कृत्य पाहून दरबारची सर दार मंडळी आव्यांत पडली असतां त्यांचा भ्रम घाल- विण्यासाठी म्हणून, त्यांजपुढे सोन्याचे व लोखंडाचे असे कित्येक करंडक त्याने ठेविले व त्यांस त्यांची निवड करण्यास सांगितली. दरवारच्या मंडळींनी सोन्याचे तेवढे करं- ss निवडून घेतले. पुढे राजानें सर्व करंडक सर्वोसमक्ष उघडविलें तो सोन्याच्या करंडकांतून हाडकें वगैरे ओंगळ पदार्थ निघाले व लोखंडाचे करंड्यांतून हिरे, माणके वगैरे निघाली.