पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्होनसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७१ करूं म्हटलें तर करंडकांच्या निवडीचेच कथानक मुख्य धरून बसॉनियों व पोशिया यांच्या विवाहसमारंभास प्रस्तुत नाटकांत मुख्य स्थळ दिले आहे यांत शंका नाहीं तथापि सर्व नाटकांतील संकटाला कारणीभुत गोष्ट म्हटली म्हणजे अॅन्टोनियो व शायलॉक या दोन पात्रांमधील हाडवैर ही होय; व ह्याच गोष्टीचा उठाव कवीने पहिले अंकापासूनच केला आहे; व याच उठावामुळे नाटकाला विशेष गंभीर स्वरूप प्राप्त होते हैं उघड आहे. तेव्हां हेंच संविधानक मुख्य होय असे वाटू लागतें. पहा कों, या नम- न्याचीं जीं पूर्वी दोन नाटकें प्रसिद्ध झाली होती ती ह्याच गोष्टीस उद्देशून रचिली होती व त्याच गोष्टीस उद्देशून “दि ज्यू ( The Jew ) आणि “दि ज्यू- आफ माल्टा " (The Jew of Malta ) अशी त्यांचीं नांवें त्यांचे कर्त्यांनी ठेविली होती फार काय सांगावें? – अॅन्टोनियो व शायलॉक यांजमधील हाड- वैराला कवीनें एवढे गंभीर स्वरूप दिलें आहे कीं, प्रस्तुत नाटक शोकपर्यवसायी करावयाचे असाच कवीचा प्रथमपासून वेत होता की काय असाहि संशय कोणासही येण्यासारखा आहे. परंतु "

  • आपले इकडेही " मर्चंट आफ व्हेनिस " यांचे जे एक भावांतर

आमचे पाहण्यांत आहे, त्यांचही नांव भाषांतरकाराने "जशास तसे असें ठेविलें आहे. यावरून ही सदर भाषांतरकारांस हाडवैराची गोटच फार महत्वाची बाटली, असें दिसतें. + प्रसिद्ध टिकाकार रोये ( Rowe ) याने या नाटकासंबंधानें जे उद्गार काढले आहेत ते प्रत्यंतराकरतां वाचकांनी येथे पहावे म्हणजे झाले, तो म्हणतो:-- Though we have seen the Play ( The Merchant of Venis ) received and acted as a comedy, and the part of the Jew performed by an excellent comedian. Yet I can not but think it was designed Tragically by the Auther: There appears in it such a deadly Spirit of Revenge, such a savage fierceness and Fellness, and such a bloody designation of cruelty. and Mischief, as can not agree either with the Style or charactera of comedy. THE LIFE of SHEKESPEAR.