पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. हीच गोष्ट गौणरूपाने आणली असती तर प्रस्तुत नाटक म्हणजे एक मौजेचा फार्स असेंच होऊन बसलें नसतें काय ? अर्थात शॉयलॉक व अॅन्टोनियो यांजमधील हाडवैराची हकीकत प्रस्तुत नाटकांत फारच महत्वाची असल्यामुळे हेंच कथानक मुख्य होय असें ह्मणणें प्राप्त आहे. परंतु नाटकाच्या पूर्णतेला विशेष अगत्याची गोष्ट म्हटली म्हणजे त्या नायक व नायिका असल्या पाहिजेत ही होय; तीं हाडवैराचा कथानकांत नाहींत हें त्यांत मोठे वैगुण्य आहे. यास्तव हें कथानक मुख्य म्हणतां येत नाहीं. आंगठ्यांची गोष्ट ही तर प्रस्तुत नाटकाच्या ४ थ्या अंकाचे शेवटीं शेवटीं जोड- लेलें केवळ शेपूट होय; तें नसतें तर चार अंकांतच हे नाटक समाप्त झालें असते, पण हैं शेपूट जोडून एकंदर नाटकास कसें आनंदपर्यवसायी केलें आहे, याकडे फार फार लक्ष देण्यासारखें आहे. कित्येकांस तर हें आंगठ्यांचे शेपूट हाच नाटकाचा मुख्य विषय असें वाटत असल्याचा भास होतो. पण वस्तुतः तें एक तात्पुरतें जोडलेले शेपूटच होय. याहून त्यास ज्यास्त महत्व देतां येत नाहीं, हें उबड आहे याचप्रमाणे जेसिकेच्या पलायनांची हकीकतही दुय्यम प्रतीची असल्यामुळे तेही केवळ गौण कथानक असून त्यासही विशेष महत्व देतां येत नाहीं. करंडकांच्या निवडणूकीचं कथानकांत मात्र नायक व नायिका आहे व कथेची पूर्णताही झालेली आहे, यास्तव हेंच कथानक मुख्य आहे हे उघड आहे. पण नुसतें हें कथानकच पाहिलें तर ते इतके साधें आहे, व त्यांत विविध प्रसंगांचा इतका ओभाव आहे कीं, त्यांत चमत्कार वाटण्यासारखें असें कांहीं भासत नाहीं. तथापि

  • याचें प्रत्यंतर पाहिजे असल्यास प्रस्तुत नाटकाचीं जीं दोन भाषां-

तरें मराठींत यापूर्वी होऊन गेलीं आहेत, त्यास भाषांतरकारांना जी नांवें दिली आहेत, यावरून येईल. एका भाषांतराचें नांव "मोहनेची आंगठी ” आणि दुसन्याचें “प्रणयमुद्रा " अशी आहेत. यावरून आंगठ्यांचे कथानकच भाषांतरकारांस नाटकांत मुख्य विषय वाटत असून त्यावरून नाटकास नांव देण्यास तो योग्य आहे, अशी त्यांची समजूत झाली आहे असें दिसतें.