पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८७ अगोदरच पुष्कळसा मजकूर येऊन गेला आहे. यास्तव त्याचे उद्घाटन येथे करण्याचे कारण दिसत नाहीं. तथापि ह्या पात्राचा विचार करीत असतां स्वतः संबंधाची व्यक्तिविषयक अशी एक गोष्ट येथे सांगितल्यावांचून राहवत नाहीं. प्रस्तुत भाषांतर कित्येक मित्रांनी वाचल्यावर, यांत शायलॉक याची भाषणें फार चांगली उतरली असून, विशेषतः हें पाल सुरेख वटलें असल्याविषयीं त्यांचे ह्मणणे पडले; आणि आह्मांसही तें पटलें हें प्रांजलपणे आह्मी कबूल करतो. याचें कारण आह्मांसतरी एव- ढेंच दिसतेच की, एका दुष्ट सावकाराने आमच्या एका जिवलग मित्राच्या ' काळिजाला हात घालण्याची तयारी करूनच न sian त्याच्या 'अर्ध्या उत्तमांगा ' चा सर्वस्वी नाश करून, त्याला जगांतून उठविलें, तो प्रसंग आमच्या हृदयांत निरंतर उभा आहे, व त्याच्या हृदयमेदक शिव्याशापांची व छळणूकीची आठवण ताजी आहे. अशा ह्या नीच माणसाचें नांव येथे लिहून कागदास डाग पाडणें वरें दिसत नाहीं. जगांतून दुष्ट मनुष्यांचा सर्वस्वी नायनाट होणें असंभाव्यच; तरी परमेश्वरा ! चांगल्या कामांतही शायला सारख्याची मदत घेण्याची बुद्धि तूं कोणास होऊं देऊ नकोस, एवढेच तुजपाशीं हात जोडून मागणें आहे. याशिवाय आणस्त्री दोन पात्रे येथें उल्लेखीत करण्यासारखीं आहेत; ती नेरिसा व जेसिका हीं होत. यांपैकी पहिली पोर्सि- येच्या स्त्री परीजनांपैकी असून थेट तिच्या वळणाची आहे; आणि जेसिका ही शायलॉक याची मुलगी असून, तिची आई तिच्या लहानपणी तिच्या आठवणीच्या आधींच वारली होती. व ती शायलॉक यासारख्या धनलोभी व खाष्ट बापाचे वरी लहानाची मोठी झाली असल्यामुळे मायेचा मृदु हात तिच्या पाठीवरून कधीं फिरला असेल असे वाटत नाहीं. सारांश ती प्रेमळ वागणुकीस पहिल्यापासूनच पारखी असल्यामुळे लॉरेन्झो याजसारख्या प्रेमळ गृपस्थाची गांठ पडून मायाळूपणाचा ओलावा मिळतांच ती प्रेमाच्या पाशांत पडते, व आपल्या