पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/97

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पत्रसंवाद हेही त्याचं मोठं कारण होतं असं अभ्यास करताना लक्षात येतं. सन १९२० ते १९७६ असा ५६ वर्षांचा खांडेकरांचा पत्रप्रपंच म्हणजे त्या काळची माणसे व मने यांचं विशुद्ध प्रतिबिंबच.

 त्यात एकविसाव्या शतकातील वाचकांनी स्वतः न्याहाळायला हवं. आजच्या असंवाद स्थितीची कोंडी कदाचित त्यातून फुटेल आणि नव्या युगाचा नवा संवाद सुरू होईल, माध्यम कदाचित वेगळे असू शकेल.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/९६